Corona R Value : ‘आर व्हॅल्यू’चं प्रकरणं नेमकं काय… कोरोनाची चौथी लाट येणार?

| Updated on: Apr 21, 2022 | 7:34 PM

भारतात गेल्या काही दिवसांपासून ‘आर व्हॅल्यू’मध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ‘आर व्हॅल्यू’ म्हणजे काय? तिचे वाढणे इतके का चिंताजनक आहे? भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या लेखातून जाणून घेउया...

Corona R Value : ‘आर व्हॅल्यू’चं प्रकरणं नेमकं काय... कोरोनाची चौथी लाट येणार?
Image Credit source: TV9
Follow us on

कोरोनाची (Corona) तिसरी लाट सौम्य होती, सोबत लसीकरणाची टक्केवारीही  वाढल्याने आता चौथी लाट येणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच दुसरीकडं दिल्ली, नोएडा (Noida) आणि गाझियाबाद येथून कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीच्या बातम्या येत आहे. यात, सर्वाधिक बाधित लहान मुले आहेत. या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढला आहे. चेन्नईच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅथेमॅटीकल सायन्सच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची भयावहता सांगणारी ‘आर व्हॅल्यू’ (R value) गेल्या तीन महिन्यांमध्ये 1.0 च्या खतरनाक पायरीच्या पुढे गेली आहे. 5 ते 11 एप्रिल दरम्यान ‘आर व्हॅल्यू’ 0.93 टक्के होती. ती आता वाढून 12 ते 18 एप्रिल दरम्यान 1.07 पर्यंत जाउन पोहचली आहे.

काय असते ‘आर व्हॅल्यू’

‘आर व्हॅल्यू’चे संपूर्ण नाव ‘रिप्रोडक्शन व्हॅल्यू’ असे आहे. व्हायरसच्या संदर्भात याचे अधिक विश्‍लेषण करायचे झाल्यास, रिपोडक्शन म्हणजे व्हायरसचा वाढता पादुर्भाव. या व्हॅल्यूच्या माध्यमातून एका कोरोनाबाधितापासून अजून दुसरे किती जण बाधित होउ शकतात याचा अंदाज बांधण्यात येत असतो. त्यामुळे ‘आर व्हॅल्यू’चा वाढता टक्का अधिक चिंताजनक असतो. जर कोरोनामुळे 100 लोक बाधित झाले आहेत असे मानले आणि त्यांनी दुसर्या नव्या 100 लोकांना बाधित केले तर या वेळी ‘आर व्हॅल्यू’ 1 असेल. तसेच जर पहिल्या 100 बाधित लोकांनी दुसर्या 50 जणांना बाधित केले तर ‘आर व्हॅल्यू’ 0.50 असेल.

याचे मोजमाप कसे होते?

केवळ कोरोनो केसेसचा अभ्यास करुन ‘आर व्हॅल्यू’चे मोजमाप होउ शकत नाही. यासाठी कोरोना संक्रमणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या, हॉस्पिटलमध्ये भर्ती झालेल्या रुग्णांची संख्या त्यांची रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आणि कोरोना चाचण्यांचे आकडे आदींच्या माध्यमातून ‘आर व्हॅल्यू’चे मोजमाप केले जात असते.

वाढत्या कमी होत्या आर व्हॅल्यूचा अर्थ जाणून घ्या

सध्या भारतात ‘आर व्हॅल्यू’ 1.07 आहे. यामुळे ही गोष्ट येथे स्पष्ट होतेय की, एक संक्रमित व्यक्ती एकाहून अधिक जणाला बाधित करीत आहे. जर ‘आर व्हॅल्यू’ पुढील काही काळासाठी इतकीच किंवा यापेक्षा जास्त राहिल्यास, देशातील कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिलच्या सुरुवातीला ‘आर व्हॅल्यू’ 1.0 होती याचा अर्थ कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये तेजीने वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना महामारीच्या सुरुवातीला ‘आर व्हॅल्यू’चे मुल्यमापन करणार्या चेन्नईच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅथेमॅटीकल संशोधक सीताभ्र सिंहा याचे म्हणणे आहे, की या आधी 16 ते 22 जानेवारी दरम्यान आर व्हॅल्यू 1.0 च्या वर पोहचली होती. त्या वेळी तिसरी लाट आलेली होती. देशात रोज 2 लाख कोरोना केसेस समोर येत होत्या अन् या केसेस वाढण्यामागे प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश हे तीन राज्य जबाबदार होती. एचटी रिपोर्टनुसार, मुंबई, बंगलुरु आणि चेन्नईमध्ये ‘आर व्हॅल्यू’ 1 पेक्षा वर पोहचली आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हा आकडा 2.0 वर आहे.

SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला

Pimpari Cp Transfered : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उचलबांगडी, अंकुश शिंदे यांची नियुक्ती

Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपद राजेश टोपेंकडे जाणार! सूत्रांची माहिती