AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपद राजेश टोपेंकडे जाणार! सूत्रांची माहिती

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मोठी माहिती मिळतेय. गृहमंत्री पदावरुन दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. मात्र, गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 1 मे पूर्वीच हा फेरबदल होईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपद राजेश टोपेंकडे जाणार! सूत्रांची माहिती
दिलीप वळसे पाटील, राजेश टोपेImage Credit source: TV9
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: sagar joshi | Updated on: Apr 21, 2022 | 8:05 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपांची मालिका लावली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)  नेतेही गृहविभागाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. अशावेळी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मोठी माहिती मिळतेय. गृहमंत्री पदावरुन दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. मात्र, गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 1 मे पूर्वीच हा फेरबदल होईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Agency) महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांवर छापेमारी सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस किंबहुना गृहखातं भाजप नेत्यांविरोधात कठोर कारवाई करत नसल्याचा एक सूर महाविकास आघाडीतूनच उमटत होता. तेव्हापासून गृहखातं दुसऱ्या कुणाकडे दिलं जाणार याबाबत चर्चा सुरु होती.

संजय राऊतांची उघड नाराजी

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणात उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. तसंच किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनाही उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहखात्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घेण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही उदाहरण दिलं होतं.

खडसेंचा पवारांसमोर वळसे पाटलांना सल्ला

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या समोरच दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याबाबत एक सल्ला दिला होता. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही एकनाथ खडसे म्हणाले होते.

इतर बातम्या :

Supriya Sule On Ganesh Naik : गणेश नाईकांच्या ‘त्या’ प्रकरणावर बोलता बोलता सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी अन् दादाची मुलही…

Pimpari Cp Transfered : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उचलबांगडी, अंकुश शिंदे यांची नियुक्ती

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार