Health : एकमेकांचं उष्ट खात असाल तर थांबा, कारण… एकदा जरूर वाचा ही बातमी!
उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते किंवा वेगवेगळे गंभीर आजार होऊ शकतात. तर उष्टे पदार्थ का खाऊ नयेत आणि उष्टं खाल्ल्यामुळे कोणकोणते आजार निर्माण होऊ शकतात याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई : आपण आपल्या प्रिय व्यक्तींसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत आपल्या गोष्टी शेअर करत असतो. शेअर करण्याची सवय खूप चांगली आहे पण तुमची हीच सवय कधी कधी तुम्हाला घातक ठरू शकते. तर बहुतेक लोक एखादा पदार्थ खात असतील तर ते त्यांच्या प्रिय व्यक्तीला किंवा मित्र-मैत्रिणींना उष्टा करून खायला देतात. पण हेच उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो.
बहुतेक लोक उष्टे पदार्थ खाताना दिसतात, पण असे उष्टे पदार्थ खाणं लोकांनी मोठ्या प्रमाणात टाळणं गरजेचं आहे. कारण जेव्हाही तुम्ही उष्टे पदार्थ खाता तेव्हा तुमच्या तोंडात बॅक्टेरिया, जंतू जाण्याची शक्यता असते. जेव्हाही तुम्ही उष्टे पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. तुम्ही एखाद्याचा उष्टा पदार्थ खाता तेव्हा त्याच्या लाळेतून तुमच्या पोटात बॅक्टेरिया, जंतू जातात. त्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उष्टे पदार्थ खाणे टाळावे.
उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे काय समस्या निर्माण होतात?
-उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. उष्टा पदार्थ खाताना समोरच्या व्यक्तीच्या लाळेतून तुमच्या पोटात जंतू जातात त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
-उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला घशात संसर्ग देखील होऊ शकतो.
-तसेच जेव्हा तुम्ही एखादा उष्टा पदार्थ खातात तेव्हा तुमच्या शरीरात फुफ्फुसाचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकते.
-उष्टे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या जिभेवर फोड येऊ शकतात किंवा तोंडात इन्फेक्शन होऊ शकते.
तर कधीही प्रत्येकाने उष्टे पदार्थ खाणं टाळावं. जर तुम्हाला पदार्थ शेअरिंग करण्याची सवय असेल तर तुम्ही ते पदार्थ उष्टे करून न देता ते तुम्ही कट करून किंवा हाताने त्याचे तुकडे करून समोरच्याला देऊ शकता.
