AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Health Day : तुम्ही दीर्घकाळ हेल्दी लाईफ जगणार की नाही?; ‘या’ 10 सवयी ठरवणार तुमचं भवितव्य

तुमच्या दैनंदिन जीवनातील सवयींवरून तुमचं आरोग्य ठरतं. दीर्घकाळात तुम्ही निरोगी जीवन जगाल की नाही हे तुमच्या काही सवयींवरून कळू शकेल. या रोजच्या 10 सवयी तुमचे आरोग्य बिघडवू शकतात !

World Health Day : तुम्ही दीर्घकाळ हेल्दी लाईफ जगणार की नाही?; 'या' 10 सवयी ठरवणार तुमचं भवितव्य
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 07, 2023 | 1:39 PM
Share

नवी दिल्ली : आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन ( World Health Day) जगभरात साजरा केला जातो. आरोग्यसेवा तज्ञ आणि काळजीवाहू पासून वैद्यकीय तज्ञांपर्यंत, प्रत्येकजण चांगले आरोग्य, प्रतिबंध आणि काळजी (health care) घेण्यास सक्रियपणे प्रोत्साहन देत असतो. बर्‍याचदा, आपली जीवनशैली आणि दैनंदिन सवयींमुळे आरोग्य खराब होते. या रोजच्या 10 सवयी (habits can ruin your health) तुमचे आरोग्य बिघडवू शकतात !

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतीवापर

मोबाईल, लॅपटॉप यांचा अतीवापर आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतो. जास्त स्क्रीन टाइम नक्कीच तुमचे आरोग्य बिघडवू शकतो कारण त्याचा परिणाम तुमचे डोळे, मान आणि एकूण शरीराच्या स्थितीवर होतो. शिवाय, यामुळे तुम्ही जास्त वेळ बसून राहता, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे.

कमी झोप घेणे

झोपेपासून वंचित असलेले किंवा कमी झोप झालेले शरीर सहजपणे थकू शकते. जेव्हा तुम्ही कमी झोपता तेव्हा तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये पूर्णपणे बाहेर पडत नाहीत त्यामुळे तुम्हाला रोग किंवा संसर्ग होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

सटरफटर खात राहणे

तळलेले आणि मसालेदार पदार्थांसह विविध प्रकारचे जड जेवण खाल्ल्याने पचनसंस्थेवर मोठा दबाव पडतो. आणि यामुळे खराब कोलेस्ट्रॉल, हृदयविकार वाढू शकतात आणि यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते.

जास्त धूम्रपान आणि मद्यपान

मद्यपान किंवा धूम्रपानाच्या अतिसेवनामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. या दोन्ही वाईट सवयी तोंड, घसा, यकृत आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहेत आणि म्हणूनच मद्यपान व धूम्रपान करणे शक्य तितके टाळले पाहिजे.

बराच काळ बसून काम करणे

जास्त वेळ बसून राहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. आणि अलीकडे अनेक आरोग्य तज्ञांनी त्याला सायलेंट कॅन्सर म्हटले आहे.

प्रक्रिया केलेली साखर व मैदा यांचे सेवन करणे

रिफाइंड साखर आणि मैदा हे दोन्ही खाणे आरोग्यासाठी खूप वाईट आहे. बहुसंख्य लोकांना आवडणाऱ्या बहुतेक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये रिफाइंड साखर आणि मैदा यांचा समावेश असतो. पण या दोन पदार्थांचे रोज सेवन केल्याने तुमच्या आरोग्याचे दीर्घकाळापर्यंत नुकसान होते.

अती मीठ खाणे

शरीराला थोड्या प्रमाणात सोडियमची आवश्यकता असते. पण दररोजच्या जेवणात वरतून मीठ घेणे आणि लोणचे, पापड यासारख्या खाद्यपदार्थांमुळे सोडियमचे असंतुलन होऊ शकते आणि रक्तदाब वाढू शकतो.

अती खाणे

तुम्ही काय आणि किती अन्न खाता, हे तुम्ही नेहमी तपासले पाहिजे. बहुतेकदा, दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा आठवड्याच्या शेवटी रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जेवण करणे अगदी सामान्य आहे. परंतु हे अती खाणं अथवा जेवण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.

पटापट खाणे

अन्न नीट न चावता, पटापट खाल्ल्याने अपचन आणि पोट फुगणे, पोटदुखी आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवतात.

झोपण्यापूर्वी जेवणे

आपण जेवलेले अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेला थोडा वेळ लागतो. जर तुम्हाला जेवून लगेच झोपायला जायची सवय असेल तर तुमच्या पचनासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे. आरोग्य तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने झोपण्यापूर्वी किमान 1.5 तास आधी रात्रीचे जेवण करावे. म्हणजेच रात्रीचे जेवण आणि झोप याती किमान दीड ते दोन तासांचे अंतर असावे. तसेच जेवणानंतर थोडा वेळ तरी शतपावली करावी.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.