AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Heart Day 2022: हार्ट फेल होण्याआधी मिळतात हे संकेत, चुकूनही करू नये दुर्लक्ष

अलीकडे हार्ट फेल होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. तिशीच्या आत देखील हृदय विकाराचा झटका येत असल्याने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरत आहे.

World Heart Day 2022: हार्ट फेल होण्याआधी मिळतात हे संकेत, चुकूनही करू नये दुर्लक्ष
हृदय विकार Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 29, 2022 | 9:02 AM
Share

मुंबई,  29 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन (World Heart Day 2022) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत (heart failure)   जागरूक करणे आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक प्रसिद्ध लोकंही काळच्या काळाच्या पद्याआड गेले. एका अहवालानुसार, 2019 मध्ये हृदयाशी संबंधित आजारामुळे जगभरात 179 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. 80 टक्क्यांहून अधिक मृत्यू केवळ हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेलमुळे झाले आहेत. यामागचे कारण म्हणजे हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. एखादी व्यक्ती हृदय रोगाच्या उंबरठ्यावर अतिशय कमी वेळात पोहोचते.  तुमचे हृदयात जर काही समस्या असेल तर ते तुम्हाला अनेक संकेत देते. हार्ट फेल्युअर होण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक लक्षणे दिसतात, (heart failure Symptoms) ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. आज जागतिक हृदय दिनानिमित्त आपण या लक्षणांबद्दल जाणून घेऊया वेळेआधी बचाव करणे सोपे होईल.

हृदयविकाराच्या आधी जाणवतात ही लक्षणे

  1.  अस्वस्थ वाटणे-  अनेक वेळा लोकांना अचानक अस्वस्थ वाटू लागते पण ते सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करतात, पण जर तुम्हाला रात्री किंवा सकाळी अस्वस्थ वाटू लागले तर हे काळजी करण्याचे कारण आहे. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
  2.  छातीत दुखणे- छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. त्यामुळे छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला छातीवर जडपणा, घट्टपणा आणि दाब जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळेत उपचार करा.
  3.  अंगभर अचानक घाम येणे- वातावरणात उष्णता नसतानाही  तुमचे शरीर घामाने घामाने भिजत असेल तर सावध व्हा. सकाळी आणि रात्री थंड घाम येणे हे हार्ट फेल होण्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, जेणेकरून तुमचा उपचार वेळेत सुरू होईल.
  4.  अत्यंत थकवा किंवा श्वास लागणे- थकल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणून आपण अधिक काम गृहीत धरतो, परंतु कधीकधी ते आपल्या हृदयाचे संकेत देखील असते. वास्तविक, जेव्हा हृदयाच्या कोणत्याही नळीमध्ये संसर्ग किंवा जळजळ होते, तेव्हा शरीराला थकवा जाणवू लागतो. हे कमकुवत हृदयाचे लक्षण आहे. दुसरीकडे, कोणतीही शारीरिक हालचाल केल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. श्वास लागणे हा हृदयविकाराचा सर्वात मोठा इशारा आहे. त्यामुळे तुमच्या हृदयातील स्थिती आणि लक्षणे वेळीच समजून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण