AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Mental Health Day 2026: शरीरासोबत मनाचीही घ्या काळजी! मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

धावपळीच्या आयुष्यात शरीरासोबतच मानसिक आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मन निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी मदत करू शकतात. चला, जाणून घेऊया मानसिक आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

World Mental Health Day 2026: शरीरासोबत मनाचीही घ्या काळजी! मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
शरीरासोबत मनाचीही घ्या काळजी
| Edited By: | Updated on: Oct 10, 2026 | 1:40 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, अपुरी झोप आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. शरीर निरोगी ठेवण्यासोबतच मनाची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आणि तणाव, चिंता यांसारख्या समस्यांवर मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. दैनंदिन जीवनातील काही सोप्या सवयी अंगीकारून मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या या कोणत्या गोष्टी आहेत

पुरेशी झोप घ्या

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. दररोज ठरावीक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं टाळा. चांगल्या झोपेमुळे मन प्रसन्न राहण्यास आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते.

नियमित व्यायाम करा

दररोज २० ते ३० मिनिटे चालणं, योगासन किंवा हलका व्यायाम करा. शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होण्यास आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते. सुरुवातीला हलक्या व्यायामापासून सुरुवात करून हळूहळू वेळ वाढवा.

सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या

सतत मोबाईल पाहणं आणि सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करणं यामुळे तणाव वाढू शकतं. त्यामुळे दिवसातील काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. या वेळेत कुटुंबासोबत गप्पा मारा किंवा आवडता छंद जोपासा.

मनातील भावना व्यक्त करा

एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर तो मनात दाबून ठेवू नका. विश्वासू मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या माणसाशी मोकळेपणाने बोला. गरज भासल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

ध्यान आणि दीर्घ श्वसनाचा सराव करा

दररोज काही मिनिटं ध्यान करा. तसेच डीप ब्रीदिंगचा सराव करा. यामुळे मन शांत होण्यास आणि तणावाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

पौष्टिक आहार घ्या

आहारात फळं, भाज्या, कडधान्यं, प्रथिनयुक्त पदार्थ आणि पुरेसं पाणी यांचा समावेश करा. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा आणि जंक फूडचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.

कामातून विश्रांती घ्या

सतत काम किंवा अभ्यास केल्याने मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे मध्येच छोटे ब्रेक घ्या. काही वेळ चालणं, शांत बसणं किंवा डोळ्यांना विश्रांती देणं फायदेशीर ठरू शकतं.

स्वतःसाठी वेळ काढा

व्यस्त दिनक्रमातून स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, बागकाम करणं किंवा आवडता छंद जोपासणं यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते.

Follow Us
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...