World Mosquito Day 2021: घरातून डास पळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

पावसाळ्याचा हंगाम जवळपास सर्वांनाच आवडतो. मात्र, या हंगामात जागोजागी पाणी साचते. ज्यामुळे डासांची उत्पत्ती होते. मग हे डास आपल्या घरात शिरतात आणि वेगवेगळे आजार आपल्याला देतात. डास फक्त आपले रक्तच पितात असे नाही, तर मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार फक्त डासांमुळे पसरतात.

World Mosquito Day 2021: घरातून डास पळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
डास

मुंबई : पावसाळ्याचा हंगाम जवळपास सर्वांनाच आवडतो. मात्र, या हंगामात जागोजागी पाणी साचते. ज्यामुळे डासांची उत्पत्ती होते. मग हे डास आपल्या घरात शिरतात आणि वेगवेगळे आजार आपल्याला देतात. डास फक्त आपले रक्तच पितात असे नाही, तर मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार फक्त डासांमुळे पसरतात. या आजारांमुळे दरवर्षी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. (World Mosquito Day 2021 Do this home remedy to repel mosquitoes)

डास दूर ठेवण्यासाठी तुम्ही डास प्रतिबंधक वापरता किंवा खोलीला जाळीचे दरवाजे आणि खिडक्या लावून घेतात. डास मच्छर कॉइल लावून मरत नाहीत. परंतु आपल्या शरीराला त्याच्या धुरामुळे नक्कीच नुकसान होते. सर्व अभ्यास दर्शवतात की, एक डास कॉइल 100 सिगारेटच्या बरोबरीने हानी पोहोचवते. अशा परिस्थितीत, काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जागतिक डास दिन दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

1. दोन ते तीन तमालपत्रे घ्या. आता एका भांड्यात कडुलिंबाचे तेल घ्या आणि त्यात एक चमचा कापूर पावडर मिसळा. हे तेल पानांवर पसरवून जाळून टाका. पानातून बाहेर पडणारा धूर 10 ते सेकंदात डासांना दूर करण्यास सुरुवात करेल. कारण ते फास्ट कार्डसारखे काम करते.

2. डासांनाही लसणाचा वास आवडत नाही. अशा स्थितीत लसणाच्या कळ्या ठेचून पाण्यात टाका आणि उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर ते एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फवारणी करा. यामुळे तुम्हाला डासांच्या समस्येपासून सुटका मिळेल. तुम्ही हे स्प्रे तुमच्या शरीरावर थोडे शिंपडू शकता.

3. कांद्याची सालीमुळे देखील घरातील डास जाण्यास मदत होते. यासाठी आपल्याला चार ते पाच कांद्याची साल लागणार आहे. सर्वात अगोदर कांद्याची साल कढईमध्ये मिक्स करा. त्यानंतर मंद गॅसवर गरम करा. या वासामुळे घरातील डास बाहेर जाण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(World Mosquito Day 2021 Do this home remedy to repel mosquitoes)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI