AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes च्या रूग्णांनो ‘या’ फळांपासून लांबच राहा, नाहीतर झटक्यात वाढेल साखरेचं प्रमाण!

तुम्हाला माहिती आहे का काही फळे अशी आहेत जी डायबिटीसच्या पेशंटसाठी हानिकारक आहेत. आता ही फळे कोणती याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Diabetes च्या रूग्णांनो 'या' फळांपासून लांबच राहा, नाहीतर झटक्यात वाढेल साखरेचं प्रमाण!
Diabetes control diet
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 08, 2023 | 11:42 PM
Share

मुंबई : सध्या बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास असतो. दररोजचे धकाधकीचे जीवन, बदलते वातावरण, टेन्शन अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास निर्माण होताना दिसतो. डायबिटीस झाल्यानंतर त्या लोकांना खूप प्रकारची पथ्य पाळणे गरजेचे असतं. नियमित गोळ्या घेण्यासोबतच आहारात पथ्य पाळणे देखील त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे डायबिटीसचे पेशंट जास्त प्रमाणात फळे खाताना दिसतात, त्यांच्या आहारात फळांचा समावेश करताना दिसतात.

चिकू – चिकू हे फळ खायला खूप गोड लागते आणि बऱ्याच लोकांना हे फळ मोठ्या प्रमाणात आवडते. पण डायबिटीसच्या पेशंटसाठी चिकू हे फळ फायदेशीर नाहीये. डायबिटीसच्या पेशंटनी हे फळ खाऊ नये, कारण ते खूप गोड असल्यामुळे त्यांची शुगर वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे चिकू हे फळ खाणं त्यांनी जास्तीत जास्त टाळावं.

लीची – बहुतेक लोकांना लीची हे फळ खायला भरपूर आवडते. पण डायबिटीसच्या पेशंट हे फळ आवडत जरी असलं तरी खाऊ नये. कारण हे फळ खायला गोड लागतेच सोबत या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे डायबिटीस पेशंटची शुगर लेवल मोठ्या प्रमाणात वाढते आणि ते डायबिटीस पेशंटसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्या पेशंटने लीची फळ खाणं.

खारिक – खारीक हा एक खजूरचा प्रकार आहे. ओले खजूर वाळवल्यानंतर त्याचे खारीक तयार होते. खजूर हे ओले असताना ते आधीच भरपूर गोड असते त्यात ते सुकल्यानंतर त्यातील गोडवा आणखीन वाढतो जे डायबिटीस पेशंटसाठी हानिकारक असते. खारीक डायबिटीसच्या पेशंट खाऊ नये नाहीतर त्यांची शुगर मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

अननस  – अननस हे फळ देखील खायला चांगले लागते आणि गोड देखील असते. पण डायबिटीसच्या पेशंटसाठी हे फळ हानिकारक ठरू शकते. हे फळ खाल्ल्यानंतर डायबिटीस पेशंटची शुगर लेवल वाढते, त्यामुळे अशा पेशंटने हे फळ खाऊ नये.

केळी  – केळी हे फळ पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण केळीमध्ये फायबरचे गुण असतात जे पचनास मदत करतात. तसेच लीची प्रमाणे केळीमध्ये सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स असते जे डायबिटीस पेशंटची शुगर लेवल वाढवते, त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने केळी खाणं टाळावं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?