Basil Leaves | चावून खाऊ नका तुळशीची पाने ! जाणून घ्या, काय आहेत कारणे

Basil Leaves | तुळशीची पाने खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत, असे मानले जाते की रिकाम्या पोटी तुळशीची 2-3 पाने चावून खाल्यास अनेक फायदे मिळतात. मात्र तुळशीची पाने चावून खाऊ नयेत, त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?

Basil Leaves | चावून खाऊ नका तुळशीची पाने ! जाणून घ्या, काय आहेत कारणे
चावून खाऊ नका Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 1:05 PM

Basil Leaves | तुळस (Tulsi / basil leaves) खूप पवित्र मानली जाते. तिचे बरेच औषधी गुणधर्मही आहेत. ही एक आयुर्वेदिक (Ayurveda) वनस्पती असून आयुर्वेदात तिला अतिशय महत्वाचे स्थान आहे. सामान्यत: प्रत्येक भारतीय घरांत तुळशीचे रोप असतेच. घराघरांत तुळशीची पूजाही केली जाते. तुळस ही आपल्या श्रद्धेसोबतच आपल्या आरोग्याशीही (good for health) जोडलेली आहे. तुळशीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी एक फायदा म्हणजे सर्दी – खोकला किंव कफ (cough and cold) झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्याने आराम मिळतो. त्याशिवाय तुळस सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि आपले आरोग्य सुधारते. असे मानले जाते की रिकाम्या पोटी तुळशीची 2-3 पाने चावून खाल्यास अनेक फायदे मिळतात. मात्र तुळशीची पाने चावून खाऊ नयेत, त्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?

का चावू नयेत तुळशीची पाने ?

असे मानले जाते की तुलशीमध्ये असलेला पारा हा घटक आपल्या दातांच्या एनॅमलसाठी चांगला नसतो. त्यामुळे तुळशीची पाने चावू नयेत. तुळशीच्या पानांमध्ये मर्क्युरी म्हणजेच पारा असत. जेव्हा तुम्ही तुळशीची पाने चावता, तेव्हा मर्क्युरी तोंडात येते. त्यामुळे तुमचे दात खराब होऊ शकतात. तसेच तुळशीची पाने किंचित अम्लीय स्वरूपाची असतात आणि आपले तोंड अल्कधर्मी बनवतात. त्यामुळे आपल्या दातांचे एनॅमल लवकर खराब होऊ शकते.

तुळशीचा चहा

तुळशीचे सेवन करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही चहामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करू शकता. तुळशीचा चहा बनवण्यासाठी पाण्यात तुळशीची पाने घालून ते पाणी 8 ते 10 मिनिटे उकळावे. त्यानंतर चवीसाठी तुम्ही त्यामध्ये थोडा मध आण लिंबाचा रस घालू शकता. या चहाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो कॅफेन-मुक्त आहे. याचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता तर वाढतेच त्याशिवाय ज्या लोकांना हाय ब्लड शुगरचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही हा चहा फायदेशीर आहे. तुळशीच्या चहामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

हे सुद्धा वाचा

तुळशीचे तूप

तुळशीच्या वाळलेल्या पानांची पावडर तयार करावी. नंतर 2 चमचे तुपामध्ये 1 चमचा तुळशीच्या पानांची पावडर मिक्स करावी. चवीनुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकता. नंतर त्यांचे सेवन करू शकता.

तुळशीचा रस

एक कप पाण्यात तुळशीची 10-15 पाने घालावीत. त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळावा व हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर हे मिश्रण गाळण्याने गाळून घ्यावे व तुळशीच्या रसाचे सेवन करावे. अशा योग्य पद्धतीने तुळशीचे सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.