AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन नवरात्रीत हिंदूंच्या जीवावर कोण उठलंय? हल्लेखोर शेकडो भक्तांवर झाडणार होता 300 गोळ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एक तरुण हिंदू मंदिरातील भक्तावर गोळीबार करणार होता, असल्याची माहिती समोर आली आहे.

ऐन नवरात्रीत हिंदूंच्या जीवावर कोण उठलंय? हल्लेखोर शेकडो भक्तांवर झाडणार होता 300 गोळ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?
templeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 10:02 AM
Share

अमेरिकेतून हादरवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील हिंदू मंदिरात भक्तांवर बंदुकधारीचा व्यक्तीचा गोळीबार करण्याचा डाव होता. तो एआर-स्टाइल आणि 300 राऊंड गोळ्या झाडणार होता. या गोळीबारात अनेक हिंदूंचा मृत्यू होण्याची शक्यता होती. परंतु ऐनवेळी हल्लेखोराचा खेळ बिघडला. त्यामुळे शेकडो हिंदूंचा जीव वाचला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

इलिनोइसच्या ऑरोरा भगात हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्याचा डाव आखण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा तरुण पॅलेटाइनचा राहणारा आहे.  एलेक्जेंड्रॉस पॅपोराकिस असे या तरुणाचे नाव आहे. त्याने एकाचवेळी शेकडो लोकांवर गोळीबार करण्याचा डाव आखला होता. एलेक्जेड्रॉस हा शस्त्र घेऊन पोहोचला. त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्याच्या बंदुकीत अचानक बिघाड झाला.  19 वर्षीय आरोपी हा फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये कॅसियर म्हणून काम करतो. उत्तर पश्चिमच्या पॅलटाइनच्या पोलिसांच्या माहितीनुसार, पॅपोराकिसने ऑरोराच्या एका हिंदू मंदिरात भारतीय लोकांची हत्या करण्याचा डाव आखला होता. त्याने रविवारी सर्व भक्तांवर हल्ला करण्याचा डाव आखला होता. 19 वर्षीय मुलगा मंदिरात पोहोचल्यानंतर बंदूक बिघडली. त्यामुळे त्याला लोकांवर हल्ला करता आला नाही.

नेमकं काय घडलं?

आरोपीने एकाच वेळी सर्व भक्तांवर गोळीबाराचा डाव आखला होता. ऑरोरा येथे हिंदूंचं सर्वात मोठं मंदिर आहे. या मंदिरात 11 ऑक्टोबर रोजी भक्तांची एकच गर्दी झाली होती. यामुळे आरोपीने भारतीयांवर गोळीबाराचा प्लान रचला होता. परंतु पॅपोराकिसची बंदूक बिघडल्याने कोणतीही विपरिती घटना घडली नाही. आरोपी हा 300 गोळ्या झाडणार होता. त्याच्याजवळ बॉडी आर्मर, पेट्रोलचा कॅन होता.

पॅलाटाइनने आईची गाडी घेऊन ऑरोरा मंदिर परिसरात पोहोचला होता. त्याने मंदिरात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंदूक बिघडली. त्यामुळे पुन्हा घरी परतला. त्याने घटनास्थळी बिघडलेली बंदूक कशी दुरुस्त करायची, याविषयी गुगलवर सर्च केलं होतं. त्याने त्याच्या मित्राला देखील गोळीबाराचा प्लान आखल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने चिंता व्यक्त केली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय.

Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....