त्सुनामीमुळे इंडोनेशियात 281 जणांचा मृत्यू

जकार्ता : इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे तब्बल 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार लोक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. शनिवारी रात्री उशिरा अनका क्राकातोआ ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने ही त्सुनामी आली आणि यामुळे मोठ्या लाटा निर्माण झाल्या. या लाटांचा फटका समुद्र किनाऱ्याजवळील राहणाऱ्यांना बसला आहे, तसेच अनेक इमारती कोसळल्या आहेत. जगातील …

त्सुनामीमुळे इंडोनेशियात 281 जणांचा मृत्यू

जकार्ता : इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे तब्बल 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार लोक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. शनिवारी रात्री उशिरा अनका क्राकातोआ ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने ही त्सुनामी आली आणि यामुळे मोठ्या लाटा निर्माण झाल्या. या लाटांचा फटका समुद्र किनाऱ्याजवळील राहणाऱ्यांना बसला आहे, तसेच अनेक इमारती कोसळल्या आहेत. जगातील सर्वाधिक भूकंप आणि त्सुनामी इंडोनेशियामध्ये होतात.

इग्लंडच्या पोर्टसमाउथ यूनिव्हर्सिटी प्रोफेसर रिचर्ड टियूंच्या मते, सुंदाच्या समुद्र किनारी अजून एक त्सुनामी येण्याची शक्यता आहे. क्राकातोआ ज्वालामुखी अजूनही सक्रिय आहे. यामुळे पुन्हा समुद्रात भूस्खलन होऊ शकते. 1883 मध्ये क्राकातोआ ज्वालामुखी फाटल्यामुळे 36 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

त्सुनामीचा धोका इंडोनेशियावरुन अजून टळला नसून मृतांचा आकडाही वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सुमात्राच्या दक्षिण लाम्पुंग आणि जावा च्या सेरांग आणि पांदेलांग विभागात त्सुनामीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, समुद्रापासून 15 ते 20 मीटर उंच लाठ येत होती. सध्या बचावकार्य सुरु आहे. यावर्षी सुलवेसू द्वीपमध्ये आलेल्या भूकंपामुळे एकूण 800 लोकांचा मृत्यू झाला होता.

सर्वाधिक भूकंप आणि त्सुनामी इंडोनेशियामध्ये का येतात?

जगात सक्रिय ज्वालामुखी जास्त प्रमाणात इंडोनेशियामध्ये आहेत. यामुळे इथे रिंग ऑफ फायर किंवा आगीचा गोळा बोललं जाते. या क्षेत्रात नेहमी भूकंप आणि त्सुनामी येते.  2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तब्बल सव्वा दोन लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हिंदी महासागरात या त्सुनामीने मोठी हानी केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *