
जगात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत, विमानं हायजॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण अशी एक घटना जी आजही आठवली तरी हादरायला होतं. हा हल्ला म्हणजे 9/11. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेवर मोठा हल्ला केला होता. त्यांनी 4 विमाने हायजॅक केली होती. त्यापैकी 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळली, एक विमान पेंटागॉनवर आदळलं आणि तर एक शेतात कोसळलं. या हल्ल्यात सुमारे 3000 लोक मारले गेले. हा हल्ला इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ला मानला जातो. ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या हल्ल्याबद्दलच्या अशा काही 10 गोष्टी आहेत ज्या कदाचित ऐकल्या असतील. या गोष्टी जाणून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
9/11 हल्ल्याच्या काही धक्कादायक गोष्टी
1 : 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा अमेरिकन भूमीवरील सर्वात मोठा परदेशी हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्यात 3000 हून अधिक लोक मारले गेले, ज्यात सुमारे 400 पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी होते.
2 : नॉर्थ टॉवरनंतर विमान साउथ टॉवरला धडकले, पण त्याआधीच ते कोसळले. हल्ल्यानंतर सुमारे 56 मिनिटांनी साउथ टॉवर कोसळला, तर 102 मिनिटांनी नॉर्थ टॉवरही कोसळला. इमारती कोसळल्यानंतर धुराचे लोट चित्रात दिसत आहेत.
3 : घटनेनंतर, विविध ठिकाणी विषारी धुळीमुळे अनेक लोकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्वसनाचे आजार झाले. घटनेनंतर अनेकांना मानसिक आजारही झाले.
4 : युनायटेड फ्लाइट 93 च्या प्रवाशांना फोनद्वारे हल्ल्यांची माहिती देण्यात आली, म्हणून त्यांनी धाडस दाखवले आणि अपहरणकर्त्यांशी लढा दिला. प्रवाशांनी केलेल्या प्रतिकारामुळे विमान पेनसिल्व्हेनियातील एका रिकाम्या शेतात कोसळले. असे मानले जाते की फ्लाइट 93 चे लक्ष्य व्हाईट हाऊस किंवा यूएस कॅपिटल होते.
5 : हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी अनेक दहशतवाद्यांनी अमेरिकन फ्लाइट स्कूलमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले होते. हे दहशतवादी कायदेशीररित्या विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर अमेरिकेत आले होते.
6 : टॉवर्सवरून पडून किंवा उडी मारून सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते, कारण ते वरच्या मजल्यावर अडकले होते आणि धुरामुळे गुदमरले होते.
7 : अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईट 77 ज्या पेंटागॉन भिंतीवर आदळली तिचे दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी झाले.
8 : या संपूर्ण हल्ल्यातील ’20 वा अपहरणकर्ता’ मानल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद अल-काहतानी होते, ज्याला अमेरिकेत प्रवेश मिळू शकला नाही, असे म्हटले जाते. याशिवाय, 20 वा अपहरणकर्ता म्हणून जकारियास मौसौई आणि रमझी बिन अल-शिब यांची नावे देखील समोर येतात.
9 : मलबेमध्ये ढिगाऱ्यात फक्त आणि फक्त मृतदेह आढळले होते हे पाहून रेस्क्यू डॉग्स देखील डिप्रेशनमध्ये गेले होते. यानंतर, जिवंत लोकांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झोपवले गेले आणि त्या कुत्र्यांना बरं वाटावं, त्यांच्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्या जिवंत माणसांना तिथून रेस्क्यू केल्याचं नाटक करावं लागलं होतं. त्यानंतर रेस्क्यू डॉग्सना देखील अनेक मानसिक आजार झाल्याचं म्हटलं जातं.
10 : काही उड्डाणांमध्ये विमानांचे अपहरण करताना दहशतवाद्यांनी पेपर स्प्रे आणि रसायनांचा वापर केला. अनेक दहशतवादी बनावट ओळखपत्रे आणि चोरीच्या कागदपत्रांचा वापर करून विमानांमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते.