भिकारी महिलेच्या बँक खात्यात 1 कोटी 42 लाखाची रोकड, तब्बल 5 घरांची मालकी

सोशल मीडियावर या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

भिकारी महिलेच्या बँक खात्यात 1 कोटी 42 लाखाची रोकड, तब्बल 5 घरांची मालकी

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात असाच एक आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला आहे. एका महिला भिकाऱ्याच्या बँक खात्यामध्ये तब्बल 1 कोटी 42 लाख रुपये जमा असल्याची बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर तिच्या नावावर तब्बल पाच घरं असल्याचंही समोर आलं आहे. ही महिला 57 वर्षांची आहे. सोशल मीडियावर या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ( a 1 crore 42 lakh received in the bank account of beggar woman)

gulfnews.com च्या वृत्तानुसार, या महिलेच्या बँके खात्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपये सापडले आहेत. ही महिला इजिप्तची असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्याकडे ऐवढे पैसे कसे आले याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

स्थानिक वृत्तपत्र Al Masry Al Youm च्या वृत्तानुसार, ही महिला भिकारी एका व्हीलचेयरवर राहते. माझा पाय कापला गेला असल्याचं सांगत ही महिला भिक मागते. ती संपूर्ण वेळ व्हीलचेयरवरच असते. पण इतर वेळी ती तिच्या पायावर चालते. एका व्यक्तिने या महिलेला स्वत:च्या पायांवर चालताना पाहिलं असल्याचा दावा केला आहे.

अधिक माहितीनुसार, सदर महिलेचं नाव नफीसा आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या – 

विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

( a 1 crore 42 lakh received in the bank account of beggar woman)

Published On - 7:58 pm, Sun, 1 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI