AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात एका भिकाऱ्याने 20 हजार लोकांना दिली जंगी दावत, सव्वा कोटी रुपये खर्च केले…

पाकिस्तानातील गरीबी आणि महागाईची चर्चा सातत्याने होत असते. परंतू तेथील एका भिक्षेकरी कुटुंबाने आजीच्या श्राद्धाचे घातलेले जेवण पाहून अनेकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे.

पाकिस्तानात एका भिकाऱ्याने 20 हजार लोकांना दिली जंगी दावत, सव्वा कोटी रुपये खर्च केले...
| Updated on: Nov 17, 2024 | 7:30 PM
Share

एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटात असल्याच्या बातम्या झळकत असतात. पाकिस्तानातील गरीबीचा उल्लेख वारंवार बातम्यात होत असतो. परंतू असे असतानाही तेथील एका भिक्षेकरी कुटुंबाने आपल्या आजीच्या 40 वे श्राद्ध घातले त्यात एक कोटी रुपये खर्च केले आहेत. 20 हजार लोक या मेजवाणीला हजर होते. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील झळकत आहे. ही दावत चर्चेचा विषय ठरली आहे.

पाकिस्तानच्या गुंजारावाला येथील भिक्षा मागून जगणाऱ्या कुटुंबाने आजीच्या 40 व्या श्राद्धाच्या जेवणाचा कार्यक्रम इतक्या भव्य प्रमाणात साजरा केला की पाहणारे देखील हैराण झाले आहेत. या दावतीला आम्ही संपूर्ण पाकिस्तानाला जेवण घातल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. या मेजवाणीत मटण बिर्याणी, मुरब्बा, कोल्ड ड्रींक आणि छोटा गोश्त असे पदार्थ वाढल्याचे म्हटले जात आहे.

मेन्यूत काय काय होते ?

या मेजवाणीची सुरुवात पारंपारिक नाश्त्याने झाली. सायंकाळी मेजवाणीत खास चविष्ठ खाद्यपदार्थ वाढण्यात आले. यासाठी 250 बकरे कापण्यात आले.यात कोमल मटण, नान मटरगंज सारखा गोड भात होता. गाजर, सफरचंदाच्या अनेक डीश वाढण्यात आल्या. अनेक प्रकारची पेय देखील वाढण्यात आली.

भिकारी कुटुंबाकडे पैसै कुठून आले

हा भव्य मेजवाणी सोहळा गुजरांवाला येथील कॅट परिसरातील रहवाली रेल्वे स्थानकाजवळ आयोजित केलेला होता. यावेळी हजारोंच्या संख्येत आलेल्या पाहुण्यांना खास शामियात बसवून जेवण वाढण्यात आले. या मेजवाणीतील वारेमाफ खर्च पाहून यांना भिकारी कुटुंबाची लाईफ स्टाईल चर्चेत आली आहे. या भिकारी कुटुंबाकडे अचानक एवढा पैसा आला कोठून यावर आता चर्चा होत आहेत.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल