या मुस्लिम देशांमधील महिलांचं आयुष्य म्हणजे अक्षरश: नर्क; जन्माला येताच असते मृत्यूची प्रतिक्षा

या मुस्लिम देशात मुलीचा जन्म म्हणजे अक्षरश: खडतर दिवसांची सुरुवात, जन्माला येताच महिलांना असते स्वतःच्याच मृत्यूची प्रतिक्षा... महिलांचं आयुष्य म्हणजे नर्क... जाणून व्हायल थक्क

या मुस्लिम देशांमधील महिलांचं आयुष्य म्हणजे अक्षरश: नर्क; जन्माला येताच असते मृत्यूची प्रतिक्षा
फाईल फोटो
| Updated on: Jul 18, 2025 | 12:41 PM

तसं पाहायला गेलं तर महिलांचं आयुष्य हे पुरुषांच्या आयुष्यापेक्षा फार कठिण असतं… असे अनेक कठीण प्रसंग आहेत, ज्यांचा सामना महिलांना करावाच लागतो आणि यामध्ये महिला एकट्याच झुंजत असतात.. पुरुष प्रधान संस्कृती, महिलांवर लादण्यात आलेले अनेक नियम… जेथे पुरुष घराबाहेर आनंदाने जगतात तर, त्याच ठिकाणी महिलांवर नियम लागले जातात. त्यामुळे पुढचा जन्म मुलीचा आणि त्यानंतर बाईचा नको… असं अनेक महिला म्हणतात. पण एक असं देश आहे जेथे महिला इतक्या त्रस्त आहेत की, त्या मृत्यूच्या प्रतीक्षेत असतात.

मुस्लिम धर्मात महिलांसाठी अनेक नियम आणि अटी आहेत. अनेक मुस्लिम देश असे देखील आहेत, जेथी महिलांवर असंख्य अटी आणि निर्बंध आहेत. काही वर्षांपूर्वी अफगानिस्तान या देशात महिलांना थोडीफार तरी सुट होती. पण जेव्हापासून देशात तालिबानी सत्ता आली आहे, तेव्हापासून महिलांचं आयुष्य नरक झालं आहे. महिला स्वतःच्या इच्छेने घराबाहेर देखील पडत नाहीत. महिलांचं घराबाहेर पडणं देखील कठिण झालं आहे.

तालिबान राजवटीत अनेक निर्बंध

जेव्हा पासून अफगानिस्तानमध्ये तालिबानचं राज्य सुरु झालं आहे, तेव्हापासून महिलांच्या स्वतंत्र्याला ग्रहण लागलं आहे. देखील महिलांना असे कपडे घालण्याची परवानगी नाही, ज्यामध्ये शरीराचा एकही अंग दिसेल… बाहेर पडताना महिला स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत झाकून ठेवतात. कितीही उष्णता असली तरी महिलांना नियम पाळावेच लागतात.

एवढंच नाही तर, अफगानिस्तानमध्ये महिलांना घराबाहेर पडण्याची देखील परवानगी नाही. शिवाय, दोन महिला एकमेकींसोबत बोलू देखील शकत नाहीत. घराबाहेर निघायचं असेल तर, महिलांसोबत घरातील एक पुरुष तरी असायला हवा…

हिसकावून घेतले शिक्षणाचे अधिकार

तालिबानचं राज्य येताच त्यांनी अफगाण महिलांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला. महिला प्राथमिक शाळेपलीकडे शिक्षण घेऊ शकत नाहीत. शिवाय, महिला पत्रकार देखील बुरख्यात बातम्या वाचते. कोणती महिला आजारी असेल तर, तिच्यावर फक्त डॉक्टर महिलाच उपचार करु शकते…

सर्वात धक्कादायक म्हणजे, अफगानिस्तान या देशात महिला डॉक्टर मिळणं देखील फार कठीण आहे. अशात आजारावर उपचार होणं शक्यच नाही. याचा अर्थ असा की अफगाणिस्तानात स्त्री असणे हे शापापेक्षा कमी नाही. येथील महिला जन्माला येताच स्वतःच्या मृत्यूची प्रतिक्षा करत असतात.