
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात जवळपास 3 तास बैठक चालली. या बैठकीतून कुठलाही ठोस तोडगा निघाला नाही. पुतिन यांनी पुढच्या बैठकीसाठी ट्रम्प यांना मॉस्कोला येण्याच निमंत्रण दिलं. त्यानंतर जगातील जवळपास 100 देशांसाठी एक गुड न्यूज आली आहे. ती मोठी दिलासा देणारी बातमी आहे. या बैठकीनंतर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये जवळपास 2 टक्के घसरण झाली. वास्तवात जगात 98 देश कच्चा तेलाच उत्पादन करतात. कच्चा तेलाचा जगातील 100 देशांना पुरवठा होतो. कच्चा तेलाच्या किंमतीत दिलासा मिळाल्यामुळे ग्लोबल एव्हरेज महागाई कमी होते.
बैठकीनंतर बाजार बंद झाला, त्यावेळी अमेरिकी क्रूड ऑईलचे दर जवळपास दोन टक्के घसरणीसह बंद झाले. आखाती देशातही कच्चा तेलाच्या दरात दीड टक्के घसरण झाली. खास बाब म्हणजे आखाती देश आणि अमेरिकन तेल ऑगस्ट महिन्यात 9 टक्क्यांपेक्षा जास्त स्वस्त झालय. ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीचा कच्चा तेलाच्या किंमतीवर कसा परिणाम झालाय ते समजून घ्या.
या बैठकीत एकच गोष्ट घडली
ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्कामध्ये जवळपास 3 तास बैठक चालली. यात बहुतांश मुद्यांवर एकमत न झाल्याची बातमी आहे. याचा अर्थ पुतिन आपल्या अटी-शर्तींवर कायम आहेत. ट्रम्प यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं. फक्त एकच गोष्ट घडली ती म्हणजे दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांकडून पुढच्या फेरीच्या चर्चेचा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. ट्रम्प स्वत: म्हणाले की, मी पुतिन यांना लवकर भेटणार. पुतिन यांनी पुढच्या बैठकीच ठिकाणं मॉस्को ठरवून टाकलं.
अजूनही मार्ग खुला
याचा अर्थ दोन्ही देशांमध्ये लवकरच एक बैठक होऊ शकते. रशिया-युक्रेनमध्ये शांतता स्थापित होण्याचा मार्ग बंद झालेला नाही. याचे संकेत तेलाच्या किंमतींनी दिले आहेत. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली आहे. याचा अर्थ शांततेसाठी रशिया-अमेरिका दोन्ही देश तयार आहेत.
अनेक देशांना कसा दिलासा मिळाला?
इंटरनॅशनल मार्केट बंद झाल्यानंतर अमेरिकी क्रूड ऑईलची किंमत जवळपास 2 टक्क्याने घसरली. ऑगस्ट महिन्यात अमेरिकी क्रूड ऑईलच्या किंमतीत 9.32 टक्के म्हणजे 6.46 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यात क्रूड ऑईलच्या आघाडीवर जगातील अनेक देशांना दिलासा मिळाला आहे.
भारताचा फायदा काय?
दुसरीकडे खाडी देशाच्या कच्चा तेलाच्या किंमतीतही जवळपास दीड टक्के घसरण पहायला मिळालीय. आकड्यांनुसार 15 ऑगस्टला इंटरनॅशनल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.48 टक्के घसरणीसह 65.85 डॉलर प्रति बॅरल पहायला मिळाले. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत कमी होणं हा भारतासाठी चांगला संकेत आहे. भारत खाडी देशातूनही मोठ्या प्रमाणाच कच्चा तेलाची आयात करतो. ट्रम्प-पुतिन बैठकीनंतर अमेरिका नव्या निर्बंधाची कारवाई करणार नाही असे संकेत मिळतायत. हेच कच्चा तेलाचे दर कमी होण्यामागच एक कारण आहे. भारत सध्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतोय. तसच आखाती देशातूनही कच्चा तेलाची खरेदी सुरु आहे. येणाऱ्या दिवसात हे दर अजून कोसळले तर जगातील अन्य देशांप्रमाणे भारतालाही त्याचा फायदा आहे.