AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेसोबतच रशियाने दिला धक्का, भारताच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, पुतिन यांनी थेट…

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लादण्यात आलाय. टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेत संबंध ताणले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात भेट झालीये. या बैठकीत काय होणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या.

मोठी बातमी! अमेरिकेसोबतच रशियाने दिला धक्का, भारताच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, पुतिन यांनी थेट...
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Aug 16, 2025 | 8:11 AM
Share

टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भेट झाली. या भेटीचा मुख्य मुद्दा हा युक्रेन युद्ध होता. मात्र, भारतावर टॅरिफ लादल्यानंतर रशियाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबत भेट घेतली. रशियाकडून भारत कच्चे तेल खरेदी करत असल्यानेच भारतावर टॅरिफ लादलाय. याबद्दल बोलताना स्वत: डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारतावर आता तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतिन यांनी फोन केला आणि दोघांमध्ये काहीवेळ चर्चा देखील झाली.

त्यानंतर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार असल्याचे पुढे आले. 15 ऑगस्टला अलास्कामध्ये या दोघांमध्ये भेट झाली. रशियामुळे भारताने अमेरिकेसोबत पंगा घेतलाय. हेच नाही तर अमेरिका दबाव टाकत असताना देखील रशियासोबतचा तेल खरेदीचा करार हा भारताकडून संपवण्यात आला नाहीये. हा अमेरिकेला मोठा झटका भारताने दिला असून त्यांचा अटी मान्य केल्या नाहीत.

रशियासाठी अमेरिकेसोबत भारताने पंगा घेतलेला असतानाच अलास्का येथील भेटीनंतर पुतिन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना मॉस्को भेटीचे निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसमध्ये पुतिन यांना लवकरच भेटू म्हटल्यानंतर पुतिन यांनी थेट म्हटले की, पुढची भेट मॉस्कोमध्ये…यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही आनंदाने प्रतिक्रिया देत म्हटले की, वाह…हे खास आहे…पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

कारण दोन्ही देश या बैठकीच्या अगोदर चेतावणी देताना दिसले. मात्र, प्रत्यक्षात भेटीनंतर एक वेगळेच वातावरण बघायला मिळाले. ज्या भारताने रशियासाठी अमेरिकेसोबत पंगा घेतला ते पुतिन अशाप्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना बोलताना दिसल्याने नेमकं सुरू तरी काय हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात पडलाय. रशियाकडून भारताला धोका तर दिला जात नसल्याचा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय. मात्र, भेटीनंतर युक्रेन युद्धाबाबत दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी भाष्य केले नाहीये. टॅरिफच्या मुद्दावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?