‘कैलासा’ नंतर आता आणखी एका मायक्रो देशाची निर्मिती, नाव आहे ‘रिपब्लिक स्लोजामस्तान’ कुठे आहे हा देश

एका डीजेने स्वत:चा स्वतंत्र देश जाहीर केला आहे. अवघ्या 11.07 एकर क्षेत्रफळ असलेल्या या देशाचा सुल्तान म्हणून त्याने स्वत:ला घोषीत केले आहे.

'कैलासा' नंतर आता आणखी एका मायक्रो देशाची निर्मिती, नाव आहे 'रिपब्लिक स्लोजामस्तान' कुठे आहे हा देश
slowjamastanImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 5:48 PM

मुंबई : भारतातून पसार झालेल्या स्वामी नित्यानंद ( Nityanand ) याच्या ‘कैलासा’ ( kailasa ) या हिंदू देशाची खूपच चर्चा मागे सर्वत्र सुरु होती. आता याच धर्तीवर अमेरिकेतील ( Randy Williams – R Dub) रॅंडी विल्यम्स या डीजेने एका नवीन देशाची स्थापना केली आहे. जगभराला कोरोना साथीच्या काळात निर्बंधामुळे घरात कोंडून पडावे लागले होते, तेव्हा या डीजेने जर आपल्याला कुठल्याच देशात जाता येत नाही तर स्वत:चा स्वतंत्र देश का नाही स्थापन करावा असे मानून या मायक्रोनेशनची स्थापना केल्याचे डीजेचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील सॅन दिएगो येथील एका डीजेने स्वत:चा स्वतंत्र देश जाहीर केला आहे. अवघ्या 11.07 एकर क्षेत्रफळ असलेल्या या देशाचा सुल्तान म्हणून त्याने स्वत:ला घोषीत केले आहे. या नव्या देशाचे नाव ‘स्लोजामस्तान’ असे ठेवण्यात आले आहे. रॅंडी ‘आर डब’ ! या डीजेने अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या वाळवंटातील 11.07 एकर क्षेत्रफळाची जागा विकत घेऊन या देशाची निर्मिती केली आहे. या छोट्याशा देशाचे अधिकृत चलन देखील आहे. त्याचे नाव ‘दि डुबल’ असे ठेवण्यात आले आहे. या देशाने 1 डीसेंबर 2021 रोजी रात्री 12.26 वाजता आपण अमेरिकेपासून आपण स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात कैलासाचा प्रतिनिधी

एका बलात्कार प्रकरणात फरार असलेला आरोपी स्वामी नित्यानंद याने कैलासा नावाचा देश स्थापन केल्याचा दावा करुन तो चर्चेत आला होता. या देशाची राजदूत म्हणून नित्यानंद याची शिष्या विजयप्रिया हिने नुकतिच संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीला हजेरी लावत सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. त्यामुळे स्वामी नित्यानंद पुन्हा चर्चेत आला होता. विजयप्रियाने स्वतःला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ चे प्रतिनिधी म्हटले. संयुक्त राष्ट्रसंघात कैलासाची ती कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित होती.

नित्यानंदचा कैलासा कसा

भारतातून फरार झाल्यानंतर, नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये जमीन खरेदी केली आणि कैलासा नावाचा देश घोषित केला. त्याला ‘कैलास’ असे नाव देण्यात आले. जगातील हिंदू धर्म मानणारे 200 कोटी लोक या देशाचे नागरिक आहेत. कैलासा स्वतःचे संविधान असून येथे धर्मग्रंथ आणि मनुस्मृतीवर आधारित कायदा चालतो. कैलासमध्ये इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.