AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | ऑप्शनच नाही, ….म्हणून मालदीवला भारतासमोर झुकावच लागलं

Boycott Maldives | सध्या भारताचा शेजारच्या मालदीव बरोबर वाद सुरु आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावरुन हा सर्व वाद सुरु आहे. भारताने या टिप्पणीवर आक्षेप घेत आपली ताकत दाखवून दिली. त्यामुळे मालदीवला बॅकफूटवर जाव लागलय.

Boycott Maldives | ऑप्शनच नाही, ....म्हणून मालदीवला भारतासमोर झुकावच लागलं
india vs maldives
| Updated on: Jan 08, 2024 | 9:21 AM
Share

Boycott Maldives | मालदीव सरकारने आपले तीन मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महज़ूम माजिद यांच्याविरोधात मोठी Action घेतली आहे. या तीन मंत्र्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. हा मुद्दा भारत सरकारने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालेमध्ये भारताच्या भारतीय उच्चायुक्तांनी या मंत्र्यांच्या टिप्पणीवर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला. त्यानंतर मोहम्मद मुइज्जू सरकार बॅकफूटवर गेलं. मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांची टिप्पणी पटलेली नाही, हे दाखवून देण्याससाठी तिघांना निलंबित केलं. मोहम्मद मुइज्जू सरकारला हा विषय वाढवायचा नाहीय, कारण त्यात त्यांचच नुकसान आहे, म्हणून त्यांनी झटपट निलंबनाची कारवाई केलीय.

मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पर्यटन हे परदेशी चलन आणि सरकारी महसूलाचा मोठा स्त्रोत आहे. मालदीवची जीडीपी पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मालदीवच्या नागरिकांसाठी पर्यटन एक मोठा आधार आहे. मालदीवच्या रोजगारात पर्यटनाच योगदान 70 टक्क्याच्या आसपास आहे. भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात. 2018 मध्ये 14,84,274 पर्यटक मालदीवला गेले. त्यातले 6.1% (90,474 पेक्षा अधिक) टूरिस्ट भारतातून गेले होते. 2019 मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली. 2019 मध्ये 1,66,030 पर्यटक मालदीवला गेले होते. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता.

भारतातून मालदीवला काय निर्यात होते?

2021 मध्ये भारत मालदीवचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार ठरला. मालदीवमधून भारत स्क्रॅप धातूची आयात करतो. भारतातून मालदीवला विभिन्न प्रकारचे इंजिनिअरींग आणि औद्योगिक उत्पादन उदहारणार्थ फार्मास्यूटिकल्स, रडार उपकरण, रॉक बोल्डर, सीमेंटची निर्यात करतो. कृषी उत्पादनांमध्ये तांदूळ, मसाले, फळ आणि पोल्ट्री उत्पादनही आहेत.

EaseMyTrip चा मालदीव विरोधात मोठा निर्णय

मालदीव बहिष्कार अभियानादरम्यान EaseMyTrip ने एक मोठ पाऊल उचललय. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहे. EaseMyTrip एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले होते. त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक टिप्पणी केली. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर EaseMyTrip ने हा निर्णय घेतला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.