AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं, इस्रायलकडून रात्रभर हल्ले

इस्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी रात्रभर दक्षिण लेबनॉनवर बॉम्बफेक केली. यापूर्वी हिजबुल्लाहच्या लढवय्यांवर वॉकीटॉकी आणि पेजरमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. सलग दोन दिवस झालेल्या या हल्ल्यांमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे तीन हजार लोक जखमी झाले आहेत. उपकरणांमध्ये स्फोटके पेरण्यात आली होती.

पेजर आणि रेडिओ स्फोटानंतर, लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं, इस्रायलकडून रात्रभर हल्ले
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 19, 2024 | 7:44 PM
Share

लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवर इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत. पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर लेबनॉनवर आणखी एक हल्ला झाला आहे. इस्रायलने गुरुवारी दक्षिण लेबनॉनवर बॉम्बहल्ला केला. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये आकाशातून मेघगर्जनेचा आवाज ऐकू आला. इस्त्रायली विमानांनी लेबनॉनच्या आकाशात उड्डाण केल्याचं स्थानिक मीडियानं म्हटलं आहे. अलीकडच्या काही महिन्यांत असे आवाज सामान्य झाले आहेत. इस्रायलने सांगितले की त्यांच्या लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील गावांवर रात्रभर हल्ला केला. त्याचवेळी, हिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने दोन्ही देशांच्या सीमेजवळ पुन्हा हवाई हल्ले सुरू झाल्याचे वृत्त दिले आहे.

दोन दिवसांत 37 जणांचा मृत्यू झाला

याआधी मंगळवारी लेबनॉनमध्ये हजारो पेजर्सचा स्फोट झाला होता. पेजर स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. यानंतर बुधवारीही हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. अचानक दुपारी, रेडिओ सेट (वॉकी-टॉकी) आणि हिजबुल्लाहच्या लढाऊ इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्फोट होऊ लागला. या हल्ल्यांनंतर लेबनॉनमध्ये अराजकतेचे वातावरण आहे.

सलग दोन दिवस झालेल्या या हल्ल्यांमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे तीन हजार लोक जखमी झाले आहेत. स्फोट घडवून आणणारे पेजर आणि रेडिओ संच चार-पाच महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लेबनॉनमध्ये गेल्या दोन दिवसांत पेजर आणि रेडिओ सेटच्या स्फोटांच्या घटना जगातल्या पहिल्या घटना आहेत.

ब्रिटीश वृत्तपत्र द इंडिपेंडंटने एका तज्ञाच्या हवाल्याने म्हटले आहे की जर पेजर हॅक करून त्याचा स्फोट केला जाऊ शकतो, तर सेल फोन पुढे असेल. किंग्स कॉलेज लंडनच्या युद्ध अभ्यास विभागातील सिनियर रिसर्च फेलो डॉ लुकास ओलेजनिक म्हणाले की, पेजरऐवजी स्मार्टफोनलाही अशा हल्ल्यांमध्ये लक्ष्य केले जाऊ शकते. कारण स्मार्टफोन अधिक सहजपणे ट्रॅक करता येतात.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू