पुतिन यांचा थेट 7 बड्या देशांवर कब्जा? ट्रम्प यांच्यानंतर आता…जगात मोठी उलथापालथ!

अलेक्झांडर दुगीन यांनी रशिया एकूण सात देशांवर पुन्हा कब्जा करू शकतो. रशियात तशी ताकद आहे, अशा आशयाचे मत व्यक्त केले आहे.

पुतिन यांचा थेट 7 बड्या देशांवर कब्जा? ट्रम्प यांच्यानंतर आता...जगात मोठी उलथापालथ!
vladimir putin
| Updated on: Jan 20, 2026 | 9:48 PM

Vladimir Putin : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर थेट हल्ला करून त्या देशावर कब्जा केला आहे. ग्रीनलँडचे अध्यक्ष निकोलस मादुरो सध्या अमेरिकेतील तुरुंगात आहेत. सर्वात शक्तिशाली देशाचे प्रमुख झाल्यानंतर ट्रम्प यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या या कारवाईचे काही लोकांनी समर्थन केले आहे, तर काही लोकांनी त्यांच्या या कारवाईचा निषेध करत विस्तारवादी भूमिकेवर टीका केली आहे. असे असतानाच आता रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना सल्ला देणारे तसेच पुतिन यांचे राजकीय गुरु अलेक्झांडर दुगीन यांनी थेट सात देशांवर कब्जा करण्याचा सल्ला दिला आहे. आता या नव्या सल्ल्यामुळे जगात नवी खळबळ उडाली आहे.

कोणकोणत्या देशांवर मिळवणार कब्जा

अलेक्झांडर दुगीन यांनी रशिया एकूण सात देशांवर पुन्हा कब्जा करू शकतो. रशियात तशी ताकद आहे, अशा आशयाचे मत व्यक्त केले आहे. या सात देशांमध्ये आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान या देशांचा समावेश असू शकतो. सोव्हिएत युनियनच्या काळात याच देशांवर रशियाचा मोठा प्रभाव होता.

पुतिन यांची भूमिका नेमकी काय?

अलेक्झांडर दुगीन यांच्या या भूमिकेनंतर पुतिन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सोव्हिएत संघ पुन्हा एकदा उभारण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, असे पुतिन यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पुतिन यांच्या प्रवक्त्यांनी दिमित्री पेस्कोव यांनी तसे स्पष्ट केलेले आहे. पुतिन यांना सोव्हिएत संघ स्थापन करण्यात कोमताही रस नाहीये, असे पेस्कोव यांनी सांगितले आहे. रशियातील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार पुतिन या देशांवर नियंत्रण मिळवण्याऐवजी या देशांना युरेशियन युनियन असे नाव देऊ शकतात. तसेच अन्य मार्गांनी रशिया या देशांवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.

दरम्यान, व्लादिमीर पुतिने हे फारच महत्त्वाकांक्षी नेते असल्याचे म्हटले जाते. गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू आहे. हे युद्ध अजूनी संपलेले नाही. पुतिन यांनी युक्रेनच्या बऱ्याच भागावर नियंत्रण निळवलेले आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.