AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airstrike | इराणच्या जखमेवर अमेरिकेने चोळलं मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब, दिला मोठा धक्का

Airstrike | इस्रायल-हमास युद्धा दरम्यान इराणच्या समस्या वाढत चालल्या आहेत. आधी इराणमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आता शेजारी इराकमधून इराणसाठी एक वाईट बातमी आहे. इराणला अमेरिकेने एक मोठा झटका दिलाय.

Airstrike | इराणच्या जखमेवर अमेरिकेने चोळलं मीठ, 'या' देशात चुकता केला जुना हिशोब, दिला मोठा धक्का
America airstrike in iraq
| Updated on: Jan 05, 2024 | 11:28 AM
Share

Airstrike in iraq | दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून इराण अजून सावरलेला नाहीय. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200 इराणी नागरिकांचा दोन बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. इराणच्या या जखमा ताज्या असताना अमेरिकेने आणखी एक घाव घातलाय. इराणने हमास, हुती आणि हेजबोल्ला सारख्या दहशतवादी गटांना पोसून मोठ केलं. इराणच्या शत्रूंना त्रास द्यायचा, हाच या दहशतवादी संघटनांचा एकमेव उद्देश. आता इस्रायल आणि अमेरिका या संघटनांच्या मोहरक्यांना वेचून वेचून संपवत आहे. इराणची एकप्रकारे ही कोंडी आहे. इराणच्या भळाळत्या जखमेवर पुन्हा एकदा अमेरिकेने मीठ चोळलय. इराकमधून बातमी आहे की, अमेरिकेने एक एअर स्ट्राइक केला. त्यात मिलिशिया कमांडर अबू तकवा ठार झाला. अबू तकवाला इराणच समर्थन असल्याच म्हटलं जातं. इराकच्या मध्यभागात अमेरिकेने हा हल्ला केला.

गुरुवारी झालेल्या या हल्ल्याची माहिती आता मीडियाला मिळालीय. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा तणाव आता इतरत्र पसरू लागल्याच दिसतय. इराकी अधिकाऱ्यांचा अमेरिकेवर मोठा दबाव असताना हे सर्व घडतय. लवकरात लवकर आमचा देश सोडा, म्हणून अमेरिका आणि त्यांच्या नेतृत्वाखाली फौजांवर इराकी अधिकारी दबाव टाकत आहेत.

काय आहे पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स ?

पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स म्हणजे पीएमएफ लढवय्यांचा एक समूह आहे. काही प्रमाणात ते इराकी सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत. या पीएमएफ संघटनेच्या बगदाद ऑपरेशनचा अबू तकवा डेप्युटी हेड होता. हा अमेरिकेच्या आक्रमकतेचा परिणाम आहे, असं पीएमएफने म्हटलय. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, अमेरिकेनेच गुरुवारी हवाई हल्ला केला. अबू तकवा बऱ्याच काळापासून अमेरिकेच्या रडारवर होता.

अमेरिकेने अबू तकवाला का मारलं?

हरकत अल नुजाबा समूहाचा नेता अबू तकवाने अमेरिकन अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात खास भूमिका बजावली होती. तेव्हापासून अमेरिका अबू तकवाच्या मागावर होती. याचमुळे हरकत अल नुजाबा समूहाला अमेरिकेने वर्ष 2019 मध्ये दहशतवादी संघटना घोषित केले. हरकत अल नुजाबा, पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स पीएमएफ लढवय्यांचा एक गट आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.