Donald Trump Tariffs : शेवटी अमेरिका झुकणार? भारतावरील टॅरिफ मागे घेतला जाणार? मोठी अपडेट समोर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू केला आहे. असे असतानाच आता भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची चर्चा चालू होत आहे. त्यामुळे आता या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Donald Trump Tariffs : शेवटी अमेरिका झुकणार? भारतावरील टॅरिफ मागे घेतला जाणार? मोठी अपडेट समोर
donald trump and narendra modi
| Updated on: Sep 15, 2025 | 7:01 PM

Donald Trump Tariffs : गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या टॅरिफची चर्चा चालू आहे. रशियाला कोंडित पकडण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, हा टॅरिफ कमी व्हावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाची खुशखबर आली आहे. आता टॅरिफ कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून एक मोठी घडामोड समोर आली आहे.

नेमकं काय घडतंय?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक संबंध बळकट करण्यासाठी आता दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे प्रतिनिधी ब्रेंडन लिंच भारतात येत आहेत. सोमवारी (15 सप्टेंबर) ते भारतात येणार असून मंगळवारी (16 सप्टेंबर) रोजी दोन्ही देशांतील व्यापाराविषयी चर्चा चालू होईल. एकीकडे 27 ऑगस्ट रोजी अमेरिकेने भारतावर ट्ररिफ लावलेला असताना आता या चर्चेला वेगळे महत्त्व आले आहे. या चर्चेत वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल भारताचे प्रतिनिधित्त्व करतील.

कोणत्या विषयावर होणार चर्चा?

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेत एक अंतरिम व्यापार करार करण्याबाबत चर्चा होत आहे. भारताने अमेरिकेला व्यापारासाठी कृष्णी आणि डेअर क्षेत्र खुले करावे अशी मागणी केली जात आहे. अमेरिकेच्या या मागणीवर मात्र भारताला काही आक्षेप आहेत. कृषी आणि डेअरी क्षेत्र भारतासाठी फार महत्त्वाचे आहे. या क्षेत्रावर देशातील बऱ्याच मोठ्या वर्गाची उपजीविका अवलंबून आहे. असे असताना अमेरिकेला या क्षेत्रात प्रवेश दिल्यास या वर्गापुढे नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेच्या या नव्या चर्चेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आता भारत आणि अमेरिकेत नवी चर्चा चालू झाल्याने या बैठकीत ट्ररिफवर चर्चा होणार का? ही चर्चा फलदायी ठरली तर अमेरिका ट्ररिफ कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.