युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेचा 24 तासांत इराणवर दुसऱ्यांदा भीषण हल्ला, जगात खळबळ

america and iran clash : अमेरिकने दुसऱ्यांदा इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशामध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेचा 24 तासांत इराणवर दुसऱ्यांदा भीषण हल्ला, जगात खळबळ
| Updated on: Jun 28, 2026 | 7:55 AM

अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. २४ तासांत अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणला लक्ष्य केलं आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळील इराणमधील काही भागांवर एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा भडकला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकी सेंट्रल कमांडने सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, अमेरिकी सैन्य दलाने इराणच्या लष्करी छावण्या, ड्रोन तळे इत्यादी भागांना लक्ष्य केलं आहे. इराणचं सरकारी माध्यम IRIB ने सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भागातील सिरिक शहराजवळ स्फोटाचे आवाज आले. अनेक क्षेपणास्त्रे टेलिकॉम टॉवर डागण्यात आली. या हल्ल्याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अमेरिकेने शुक्रवारी इराणवर (Iran) मोठा हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला होता. त्यानंतरही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करू लागल्याने संघर्ष नव्याने भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिकेचा आरोप आहे की, इराणने शनिवारी ड्रोनने एका तेलाच्या जहाजावर हल्ला करत कराराचं उल्लंघन केलं. अमेरिकी सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, २० लाखांहून अधिक कच्चे तेल असलेलं जहाज हे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडत होते. त्याचवेळी या जहाजावर हल्ला करण्यात आला.

अमेरिकी सैन्याच्या दाव्यानुसार, अमेरिकेने (America) इराणला शुक्रवारी शस्त्रसंधी पाळण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी उलट हल्ला करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडने त्यांच्या निवेदनात स्पष्ट केलं की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून मालवाहू जहाजांचं दळणवळण सुरू आहे. अमेरिकेचं सैन्य सतर्क, सक्षम असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार आहे. अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या मिसाईल आणि ड्रोन तळावर हल्ले केले. ही कारवाई २५ जून रोजी सिंगापूरचा झेंडा असलेल्या मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्याने अमेरिकेला हल्ला करावा लागला’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us