AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणानंतर आता मास्क घालण्याची गरज नाही, अमेरिका आरोग्य एजन्सी CDC च्या नव्या गाईडलाईन्स

कोरोना वायरसच्या (Coronavirus) संकटात संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालणे (America CDC Issued New Corona Guidelines ) अनिवार्य असल्याचं लोकांना सांगितलं जातं.

लसीकरणानंतर आता मास्क घालण्याची गरज नाही, अमेरिका आरोग्य एजन्सी CDC च्या नव्या गाईडलाईन्स
mask
| Updated on: Mar 09, 2021 | 12:28 PM
Share

वॉशिंगटन : कोरोना वायरसच्या (Coronavirus) संकटात संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालणे (America CDC Issued New Corona Guidelines ) अनिवार्य असल्याचं लोकांना सांगितलं जातं. मात्र, आता मास्कला (Mask) अमेरिकेच्या संघीय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, पूर्णपणे लसीकरण घेतलेल्या अमेरिकी आणि इतर लस (Vaccine) घेतलेले लोक विना मास्क किंवा सामाजिक अंतर राखत इनडोरमध्ये एकत्र होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेत मास्कवरुन राजकारण तापलेलं आहे (America CDC Issued New Corona Guidelines Saying Fully Vaccinated People Can Gather Without Mask In People).

CDC च्या नव्या गाईडलाईन्स

या गाइडलाइनमध्ये हे देखील सांगण्यात आलं आहे की ज्या लोकांनी लस घेतली आहे, ते एका घरात संसर्गाची कमी जोखीम असलेल्या लोकांसोबतही विना मास्क भेटू शकतात. उदाहरणार्थ आजी-आजोबा ज्यांनी लस घेतलेली आहे आणि ते आता घाबरल्याविना आपल्या निरोगी मुलांना आणि नातवंडांना भेटू शकतात. अमेरिकेच्या ‘रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (CDC)’ने सोमवारी या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

…म्हणून नव्या गाईडलाईन्स जारी

CDC द्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्सचा उद्देश लोकांना एकमेकांना भेटण्याच्या वाढत्या मागणीला संबोधित करणे आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तरुणांना लस टोचली जात आहे. अशात त्यांच्यात याबाबत चर्चा आहे की काय आता ते कुटुंबातील लोकांची भेट घेऊ शकतात, त्यांच्यासोबत प्रवास आणि इतर कार्य करु शकतील का?

CDC च्या संचालक डॉ. रोशेल वालेंस्की (Rochelle Walensky) यांनी सांगितलं की, दररोज जास्तीत जास्त लोकांना लस दिली जात आहे. अशात आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

बाहेर जात असताना मास्क लावणे अनिवार्य

सोमवारी झालेल्या एका प्रेस ब्रिफिंगमध्ये डॉ. रोशेल वालेंस्की यांनी या नव्या गाईडलाईन्सना सामान्य जीवनात पुन्हा परतण्यासाठी पहिलं पाऊल आहे. त्यांनी म्हटलं की, संसर्गाच्या प्रकरणांमध्ये आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घसरण झाल्यानंतर लस घेतलेल्या लोकांसाठी सर्व गोष्टी पुन्हा सामान्य होतील. दरम्यान, CDC ने लस प्राप्त करणाऱ्या लोकांना आताही सांगण्यात आलं आहे की, त्यांनी बाहेर जाताना आणि मोठ्या सभेत वगैरे भाग घेताना मास्क घालावे. तसेच, सामाजिक अंतरही राखावं.

America CDC Issued New Corona Guidelines Saying Fully Vaccinated People Can Gather Without Mask In People

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE : कोरोना काळात रुग्णालयाकडून लुटालूट, खोटे रिपोर्ट दाखवून पैसे उकळ्याचे पुरावे, टोपे दखल घेणार?

पुण्यातील कोरोना टेस्ट करणाऱ्या तीन लॅब सील, कारण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.