अमेरिकेतून भारतासाठी आनंदाची बातमी, टॅरिफ होणार कमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून..

America Tariff : अमेरिकेने चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला. आता भारतवर लावलेल्या टॅरिफबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे सांगितले जातंय.

अमेरिकेतून भारतासाठी आनंदाची बातमी, टॅरिफ होणार कमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून..
America Tariff on India
| Updated on: Oct 16, 2025 | 8:58 AM

गाझा शांतता शिखर परिषदेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिंतेत असून त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे. खरोखरच त्यांनी हे मोठे पाऊल नक्कीच उचलले आहे. नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून तणावात देखील आमच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित आहेत. यादरम्यान भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आणि हे मला नरेंद्र मोदी यांनीच सांगितल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याने जगाची झोप उडलीये. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम अमेरिकेने केले. फक्त दबावच नाही तर भारतावर नफेखोरी सारखे काही गंभीर आरोपही करण्यात आले. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करणार यावर अजून काही भाष्य केले नाही.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेच्या टॅरिफचा थेट परिणाम काही भारतीय उद्योगांवर झाला. 70 टक्के अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. यासोबतच सर्व फार्मा वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ त्यांनी लावला आणि भारतीय फार्मा कंपन्यांचे धाबे दणाणली. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय कंपन्या आैषधांची निर्यात करतात. भारताला प्रत्येक बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता भारताने एक पाऊल मागे टाकल्याचे बघायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीये. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला टॅरिफ देखील काढला जाण्याचे संकेत आहेत. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा जवळपास बंद आहे. जर अमेरिकेने खरोखरच भारतावरील टॅरिफ काढला तर हा भारतासाठी मोठा दिलासा असणार आहे. परत एकदा अमेरिकेत होणारी निर्यात वाढेल. भारत 20 टक्क्यांपेक्षाही कमी टॅरिफसाठी आग्रही आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना फक्त भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल, असे म्हटले आहे. मात्र, त्यांनी टॅरिफबद्दल कोणचेही भाष्य केले नाही. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचे नुकसान भारत रशियाकडून अधिक प्रमाणात तेल खरेदी बंद करून भरून काढत होता. मात्र, एकीकडे रशियाकडून तेल खरेदी बंद आणि दुसरीकडे अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ जर काढला नाही तर भारताला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.