Trump-Zelensky Clash News : जेवण सोडा, सलाडचा एक तुकडा उचलू दिला नाही, ट्रम्पनी जेलेंस्कीना कसं पळवलं? Inside Story
Trump-Zelensky Clash News : व्हाइट हाऊसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल. पाहुणा म्हणून आलेल्या एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा असा अपमान झाला असेल. जाहीरपणे मीडियासमोर ही सगळी वादावादी झाली. युक्रेनचे राष्ट्रप्रमुख वोलोदिमीर जेलेंस्की यांना जेवण सोडा, सलाडचा एक तुकडा सुद्धा उचलू दिला नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की मोठ्या अपेक्षेने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला गेले होते. अमेरिका युक्रेनसाठी काहीतरी करेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तिथे काहीतरी वेगळच घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे जेलेंस्कींचा पाणउतारा केला. जेवण सोडा, डोनाल्ड ट्रम्प यांनी जेलेंस्कींना सलाडचा एक साधा तुकडाही उचलू दिला नाही. जेऊ घातल्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी जेलेंस्कीला व्हाइट हाऊसमधून पळवलं. शाब्दीक वादावादीनंतर सर्वकाही ठीक व्हावं अशी जेलेंस्की यांची इच्छा होती. ट्रम्प यांच्याशी पुढच बोलणं व्हावं. ऑल इज वेल असा जगाला संदेश द्यावा. पण डोनाल्ड ट्रम्प कुठे ऐकणार होते, त्यांनी जेलेंस्कीला तिथून निघून जायला सांगितलं.
शुक्रवारी रात्री अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये मोठा ड्रामा पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प आणि जेलेंस्की जाहीर पत्रकार परिषदेत सर्वांसमोर भांडले. व्हाइट हाऊसच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल. जेलेंस्कीची बोलण्याची पद्धत ऐकून ट्रम्प इतके भडकले की, जेलेंस्की आपले पाहुणे आहेत हे सुद्धा ते विसरुन गेले. त्यांनी सर्वांसमोर जेलेंस्कीना चार गोष्टी सुनावल्या. ट्रम्प यांनी युक्रेनला त्यांची जागा दाखवून दिली. जेलेंस्कीना ते एवढं सुद्धा बोलले की, तुम्ही तिसऱ्या विश्व युद्धाचा जुगार खेळताय. विषय इतका वाढला की, अमेरिकी NSA माइक वेंस यांना मध्ये हस्तक्षेप करावा लागला.
जेलेंस्की आपली बाजू मांडताना काय म्हणाले?
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की अमेरिका दौऱ्यावर आहेत. चर्चेसाठी ट्रम्प आणि जेलेंस्की मीडियासमोर बसले होते. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ही बैठक होती. त्यावेळी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मुद्यांवरुन वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यावर नाराजी व्यक्त केली. लाखो लोकांच्या जीवासोबत खेळल्याबद्दल जेलेंस्कीला सुनावलं. उपराष्ट्रपति जेडी वेंस आणि जेलेंस्की यांच्यात 45 मिनिटं चर्चा झाली. यात शेवटच्या 10 मिनिटात जोरदार वादवादी झाली. जेलेंस्की यांनी आपली बाजू मांडताना कुटनितीवरुन रशियाच्या कटिबद्धतेवर संशय व्यक्त केला. त्यासाठी मॉस्कोने तोडलेल्या काही गोष्टींचा हवाला दिला.
भांडणाची सुरुवात कशावरुन झाली?
वेंस जेलेंस्कीना असं बोलले की, “राष्ट्रपती जी सम्मानपूर्वक, मला असं वाटतं की, ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकी मीडियासमोर अशा पद्धतीने बोलणे अपमानास्पद आहे” त्यावर जेलेंस्कीने आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ट्रम्प यांचा पारा चढला. “तुम्ही लाखो लोकांच्या जीवासोबत खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या विश्व युद्धाला निमंत्रण देत आहात. तुम्ही जे करताय ते देशासाठी अपमानास्पद आहे. हा तो देश आहे, ज्याने तुमचं भरपूर समर्थन केलय” मग त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली.
