व्हेनेझुएलाला मिळाली बलाढ्य देशाची साथ; बाजी पलटली, अमेरिकेला थेट मोठा अल्टिमेटम, युद्ध भडकणार?
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं केलेल्या कारवाईनंतर आता बलाढ्य देश व्हेनेझुएलाच्या मदतीला धावून आला आहे. निकोलस मादुरो यांच्या सुटकेची मागणी करतानाच अमेरिकेला अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.

अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं. त्यावर आता जगभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. चीनने निकोलस मादुरो यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला सोडून द्यायाला पाहिजे, आणि चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला पाहिजे असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर परराष्ट्र मंत्रालयानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर अमेरिकेनं मादुरो आणि त्यांची पत्नी सिलियो फ्लोरेस यांना सुरक्षा देखील द्यायला पाहिजे, त्यांना जबरदस्तीने त्यांच्या देशातून बाहेर काढणं हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचं उल्लंघन आहे, असंही यावेळी चीनने म्हटलं आहे.
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. त्यांना अमेरिकेला नेण्यात आलं, यावर चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीसोबत व्यवहार करणं हे आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचं उल्लंघन आहे. अमेरिकेनं मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीने सुटका करावी, तसेच व्हेनेझुएलाला कमकुवत करण्याचं कारस्थान बंद करावं. जे काही प्रश्न असतील ते चर्चेद्वारे सोडवावेत असं चीनने यावेळी म्हटलं आहे.
अमेरिकेनं शनिवारी मोठी घोषणा केली, अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला असून, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो आणि त्यांची पत्नी आपल्या ताब्यात असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान अमेरिकेनं मादुरो यांना अटक करून आता न्यूयॉर्कमध्ये आणलं आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरो यांचं एक छायाचित्र देखील जारी केलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेच्या या कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. चीनने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर आता अमेरिका काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
