AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War : डोनाल्ड ट्रम्प शत्रुसारखे वागतायत पण अमेरिकेतल्या भारतीयांनी दाखवला मनाचा मोठेपणा, तिजोरी उघडली आणि…

Tariff War : भारताने अमेरिकेला नेहमीच चांगल्या मनाने साथ दिली. पण अमेरिकेने भारतासोबत संबंध ठेवताना नेहमीच व्यापारी दृष्टीकोन दाखवला. अमेरिकेचे सध्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आधीच्या अध्यक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. अलीकडे त्यांनी भारताला अनेक धक्के दिले. पण अमेरिकेतल्या भारतीयांनी मात्र आपली उदारता, सकारात्मक दृष्टीकोन थेट कृतीतून दाखवून दिलाय.

Tariff War : डोनाल्ड ट्रम्प शत्रुसारखे वागतायत पण अमेरिकेतल्या भारतीयांनी दाखवला मनाचा मोठेपणा, तिजोरी उघडली आणि...
Donald Trump
| Updated on: Oct 04, 2025 | 9:43 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतासोबत शत्रुसारखे वागत आहेत. आधी त्यांनी भारतीय सामानाच्या अमेरिकेतील आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदीच कारण देऊन अजून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. त्यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सामानावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. भारताने अमेरिकेला नेहमीच चांगल्या मनाने साथ दिली. पण तेच ट्रम्प भारतासोबत शत्रुसारखे वागत आहेत. तरीही अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी 2008 पासून आतापर्यंत अमेरिकन विश्वविद्यालयांना तीन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकच दान केलं आहे. यामुळे अमेरिकेत संशोधन, इनोवेशन आणि उच्च शिक्षणाचा पाया अजून मजबूत होणार आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय प्रवासी समुदायाच योगदान यातून दिसून येतं. एका सर्वेक्षणातून भारतीय समुदायाच्या योगदानाची बाब समोर आली आहे.

इंडियास्पोराने काय म्हटलं?

अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन विश्वविद्यालयातून पदवी घेतली. आपल्या व्यावसायिक यशाच श्रेय ते या अमेरिकन विद्यापीठांना देतात असं इंडियास्पोरा या संस्थेने म्हटलं आहे.

कुठल्या भारतीयांनी किती कोटीच दान केलं?

अमेरिकेत उच्च शिक्षण संस्थांना ऐतिहासिक दान देऊन भारतीय-अमेरिकी समुदाय त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या फक्त त्या संस्थांचा सन्मान करत नाहीय, तर भावी पिढ्यांना शिकण्याची, नेतृत्व विकासाची संधी मिळावी हा सुद्धा दूरदृष्टीकोन त्यामागे आहे असं इंडियास्पोराने म्हटलं आहे. दान देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने चंद्रिका आणि रंजन टंडन आहेत. त्यांनी न्यूयॉर्क विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंगला 10 कोटी डॉलर्सच योगदान दिलं. पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांनी येलच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटला 5 कोटी डॉलर दान केले. आतापर्यंत कुठल्याही बिझनेस स्कूलला देण्यात आलेलं हे सर्वात मोठं दान आहे. उद्यमी देशपांडेने MIT ला 2 कोटी डॉलर दान केले.

अमेरिकेप्रती व्यापक कटिबद्धता

ओहायो येथे मोंटे आहूजा, टेक्ससमध्ये सतीश आणि यास्मीन गुप्ता, फ्लोरिडात किरण आणि पल्लवी पटेलसह अन्य लोकांनी आपल्या परोपकाराने चिकित्सा आणि शैक्षणिक कार्यक्रमांना नवीन रुप दिलय. इंडियास्पोराचे संस्थापक आणि अध्यक्ष एमआर रंगास्वामी म्हणाले की, विश्वविद्यालयात गुंतवणूक करुन शिक्षणाला महत्व देणारे भारतीय अमेरिकी दानदात्यांनी चांगलं कार्य केलं आहे. अमेरिकेप्रती आपली व्यापक कटिबद्धता दाखवून दिलीय

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...