AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : मौका सबको मिलता हैं, दिवस पालटतात ते हेच, आता सगळे पत्ते अमेरिकेच्या कट्टर शत्रूच्या हातात

Iran Israel US War : नशीब आणि नियती कशी असते ते इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाने दाखवून दिलय. दिवस पालटतात खेळ बदलतो ते या युद्धातून दिसून येतय. अमेरिका-इस्रायलचे रणनितीक जाणाकार चुकले असं दिसतय. कारण सगळी बाजी आता दुसऱ्याच्याच हातात गेली आहे.

Explained : मौका सबको मिलता हैं, दिवस पालटतात ते हेच, आता सगळे पत्ते अमेरिकेच्या कट्टर शत्रूच्या हातात
US-Israel
| Updated on: Mar 13, 2026 | 1:49 PM
Share

नशीब आणि नियती हे शब्द आतापर्यंत आपण अनेकदा ऐकले आहेत. नशीब पालटायला वेळ लागत नाही आणि नियतीच्या मनात जे असतं ते घडतच. मागच्या महिन्याच्या 28 तारखेला सुरु झालेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाला हे दोन शब्द तंतोतंत लागू पडतात. अमेरिका आणि इस्रायलने रेजीम चेंज म्हणजे सत्ता बदल आणि इराणची अणवस्त्र क्षमता संपवणं ही दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन हे युद्ध सुरु केलं. त्यांचा अंदाज असा होता की, काही दिवसात आपण आपलं उद्दिष्टय साध्य करु. पण खेळ आता बदलला आहे. त्यांना जे अपेक्षित होतं ते घडतच नाहीय. या युद्धाच्या महिन्याभर आधी इराणमध्ये युवा वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु होतं. तिथला युवा वर्ग सत्ताधारी खामेनी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरलेला. यावेळी इराणने बंदुकीच्या बळावर हे आंदोलन दडपून टाकलं. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बोललेले की, मदत वाटेवरती आहे.

अमेरिकेच्या युद्ध नौका अरबी समुद्रात दाखल झाल्या. गेराल्ड फोर्ड आणि यूएसएस अब्राहम लिंकन. एका झटक्यात दोन-तीन शहरं उद्धवस्त करण्याची या विमानवाहू युद्धनौकांची क्षमता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी इराणसोबत चर्चा करुन पाहिली. त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले. इराणने अणवस्त्रांचा आणि बॅलेस्टिक मिसाइल विकासाचा नाद सोडून द्यावा हाच त्यांच्या चर्चेचा आधार होता. पण इराणने आपल्या दोन्ही महत्वकांक्षा सोडण्यास नकार दिला. परिणामी एका भीषण, घनघोर युद्धाला सुरुवात झाली.

पण काही बदललं नाही

अमेरिका-इस्रायलला वाटलेलं की, दोन तीन दिवसांच्या हल्ल्यानंतर इराणी जनता रस्त्यावर उतरुन सगळी व्यवस्था बदलून टाकेल. पण असं काही घडलेलं नाही. इस्रायलने तर इराणी न्यूज चॅनल हॅक करुन पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा संदेश प्रसारीत केला. त्यांनी इराणी जनतेला सत्ता बदलासाठी रस्त्यावर येण्याचं आवाहन केलं. पण काही बदललं नाही. यातून IRGC ची इराणवर असलेली घट्ट पकड दिसून आली.

हे इराणचं रणनितीक यश आहे

अमेरिका-इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनी मारले गेले. पण इराणने अजून हार मानलेली नाही. उलट इराण आता ज्या पद्धतीने लढतोय, अमेरिका-इस्रायल बॅकफूटवर गेलेत. इराणची रणनिती यशस्वी झाली आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग बंद केलाय. या मार्गावरुन जगातील 20 टक्के तेल वाहतूक होते. त्यानंतर इराण अमेरिकेच्या आखातामधील मित्र देशांच्या तेल रिफायनरीवर हल्ले करतोय. त्यामुळे तेल उत्पादन अनेक देशांमध्ये बंद आहे. जगात तेल आणि एलपीजी गॅसच संकट वाढू लागलं आहे. भारतात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. हे इराणचं रणनितीक यश आहे. उलट आता हे युद्ध लांबणं इराणच्या पथ्यावर पडणारं आहे.

नशीब आणि नियतीचा खेळ सुरु होतो तो इथेच

नशीब आणि नियतीचा खेळ सुरु होतो तो इथेच. चार वर्षांपूर्वी रशियाने युक्रेन विरोधात युद्ध सुरु केलं. त्यावेळी अमेरिकेने सर्व रसद युक्रेनला दिली. उलट भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतो म्हणून भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. भारत तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात लढण्यासाठी आर्थिक बळ मिळतं असा अमेरिकेचा युक्तीवाद होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्यानंतर हा टॅरिफ संपवला. पण आता वेळ बघा कशी आलीय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून एक जहाजही येऊ शकत नाहीय. पण अमेरिकेलाच भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी द्यावी लागलीय.

म्हणजे दिवस बदलले

जी अमेरिका युक्रेनला मदत करत होती. तेच आता रशिया इराणच्या बाबतीत करतोय. रशिया इराणला सॅटलाइटद्वारे अमेरिकेच्या लोकेशन्सची अचूक माहिती देतोय. त्यामुळे इराणला हल्ले करणं सोपं जातय. दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्याने जगात रशियन तेलाची मागणी वाढणार आहे. इराण सोबत चांगले संबंध असल्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून भारत-रशियाची जहाजं येऊ शकतात. आखाती देशातील तेल रिफायनरीज बंद असल्याने रशियाने तेल उत्पादन वाढवून बाजार भावाने विक्री सुरु केली आहे. इतके दिवस अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्र देऊन युद्धाचा खेळ लांबवत होता. तीच संधी आता रशियाकडे आहे. म्हणजे दिवस बदलले. युद्ध किती लांबवायचं हे आता अमेरिकेच्या कट्टर शत्रुच्या हातात आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी