AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा

शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा

| Updated on: Jun 13, 2026 | 10:57 AM
Share

राज्यातील राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले असताना भाजप नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत भाष्य केले.

आशिष देशमुख म्हणाले की, काही राजकीय वर्तुळांमध्ये शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रक्रियेमागे शरद पवार यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) काँग्रेससोबत अधिक जवळीक साधू शकते, अशीही चर्चा असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा राजकीय विचार काही स्तरावर असू शकतो.

या चर्चांवर भाष्य करताना देशमुख यांनी “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशी टिप्पणी करत विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र, या दाव्यांबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या चर्चांनी राज्याच्या राजकारणात नव्या तर्क-वितर्कांना सुरुवात झाली असून, संबंधित पक्षांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 13, 2026 10:57 AM

Follow Us