AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : युद्धाची स्थिती, पाकिस्तान एअरफोर्सच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचले ‘या’ देशाचे इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख

India vs Pakistan : सध्या पाकिस्तान धस्तावलेला आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो, ही भिती त्यांना आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीकडे डोळे लावून बसलेला आहे. कारण स्वबळावर भारताशी दोन हात करणं त्यांना झेपणार नाही. आता एका देशाचे इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख पाकिस्तान एअरफोर्सच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचले होते.

India vs Pakistan : युद्धाची स्थिती, पाकिस्तान एअरफोर्सच्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचले 'या' देशाचे इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख
Pakistan Air ForceImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 30, 2025 | 9:42 AM
Share

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी करतोय. त्याचवेळी पाकिस्तानात सुद्धा हालचाली वाढल्या आहेत. टर्कीचे जनरल स्टाफ गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल यासर कादियोग्लू यांच्या नेतृत्वाखाली एका हाय-लेव्हल डेलिगेशनने इस्लामाबादमधील पाकिस्तान एअरफोर्सच्या हेडक्वार्टरचा दौरा केला. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमध्ये भू-रणनीतिक मुद्दे, संयुक्त सुरक्षा योजना, उपग्रह कार्यक्रम आणि इमेजरी गोपनीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. रविवारी बातमी आलेली की, टर्कीने एका शस्त्रास्त्राने भरलेला कार्गो पाकिस्तानला पाठवलाय. टर्कीने ही बातमी नंतर फेटाळून लावली.

तणावाच्या काळात टर्कीच्या डेलिगेशनच पाकिस्तानात येणं, यावरुन दोन्ही देशांच्या मैत्रीमधील दृढता दिसून येते. पाकिस्तान युद्धाच्या सावटाखाली असताना हा दौरा होणं यावरुन टर्की आणि पाकिस्तानच नातं हे व्यापार, धार्मिक मुल्यापर्यंत मर्यादीत नाही, लष्करी भागीदारीपर्यंत या मैत्रीचा विस्तार होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

स्वबळावर भारताशी दोन हात करेल इतकी पाकिस्तानची सेना सक्षम नाही. पाकिस्तानला भारताकडून हल्ला होईल ही भिती सतावतेय. म्हणून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. भारताने हे स्पष्ट केलय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे जे कोणी आहेत, त्यांना शोधून संपवण्यात येईल.

भारत सरकारकडून सैन्याला फ्री हँड

22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सातत्याने बैठका सुरु आहेत. भारतीय सैन्याच काश्मीरमध्ये ऑपरेशन सुरु आहे. सीमापार म्हणजे सीमा ओलांडून सुद्धा ऑपरेशन्स होऊ शकतात. मंगळवारी भारत सरकारने सैन्याला फ्री हँड दिला. पाकिस्तानवर हल्ला करण्याची ही पूर्णपणे मोकळीक आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.