AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Missile Test : संघर्षाच्या काळात पाकिस्तानकडून अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी, रेंज किती?

भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना पाकिस्तानने एका नव्या मिसाइलची चाचणी केली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन सुरु आहे.

Pakistan Missile Test : संघर्षाच्या काळात पाकिस्तानकडून अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी, रेंज किती?
फाईल फोटोImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2025 | 2:29 PM
Share

भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना पाकिस्तानने एका नव्या मिसाइलची चाचणी केली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूने शक्ती प्रदर्शन सुरु आहे. त्यात पाकिस्तानला युद्धाची जास्त खुमखुमी आली आहे. पाकिस्तानने शनिवारी त्यांच्या नवीन मिसाइलची चाचणी केली. हे बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची रेंज 450 किलोमीटर आहे. अब्दाली नावाच हे बॅलेस्टिक मिसाइल असून ही चाचणी यशस्वी झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये ही चाचणी करण्यात आली. आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेज कमांड (ASFC) अंतर्गत ही चाचणी करण्यात आली. ऑपरेशनल यूजर ट्रायलचा हा भाग होता.

आपण आपल्या देशाचं संरक्षण करु शकतो, याची नागरिकांना खात्री पटवून देण्यासाठी ते फायटर जेट्सने युद्ध सराव करतायत. रणगाड्यांमधून मारक क्षमता दाखवत आहे. पाकिस्तानच हा सर्व प्रोपगंडा प्रचार सुरु आहे. वास्तवात त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता युद्ध झाल्यास ते जास्त दिवस टिकाव धरु शकणार नाहीत. भारताच्या सैन्य क्षमतेसमोर पाकिस्तान बराच मागे आहे. मात्र, तरीही ते युद्धाच्या पोकळ डरकाळ्या फोडत आहेत.

मिसाइल चाचणीच्यावेळी कोण-कोण हजर होतं?

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, अब्दाली वेपन सिस्टमच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिसाइलच परीक्षण मिलिट्री ड्रिल ‘एक्सरसाइज इंडस’ अंतर्गत करण्यात आलं. या चाचणी दरम्यान पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनेंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लांस डि​वीजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कूटनीतिक कारवाइनंतर पाकिस्तान सतत NOTAM (Notice to Airmen) जारी करुन क्षेत्रात मिसाइल चाचणीची धमकी देत आहे.

ग्लोबल फायरपावर रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानावर?

पाकिस्तान आर्म्ड फोर्सच्या मीडिया आणि पब्लिक रिलेशन विंग इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सनुसार (ISPR) या मिसाइल परीक्षण चाचणीचा उद्देशा सैन्याची युद्ध तयारी सुनिश्चित करणं आणि मिसाइलच्या मॉडर्न नेविगेशन सिस्टमसह प्रमुख तंत्रज्ञान निकष चेक करणं होतं. ग्लोबल फायरपावर रँकिंगनुसार सैन्य शक्ति आणि शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये जगातील 145 देशात भारत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 12व्या नंबरवर आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.