Attack on Iran : इराणवर पुन्हा मोठा हल्ला, जाहेदान हादरलं, अनेकांचा मृत्यू

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांनी सध्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र आता इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इराणवर पुन्हा हल्ला झाला आहे.

Attack on Iran : इराणवर पुन्हा मोठा हल्ला, जाहेदान हादरलं, अनेकांचा मृत्यू
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 26, 2025 | 4:07 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांनी सध्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र आता इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इराणमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इराणच्या दक्षिण -पूर्व प्रांत असलेल्या सिस्तान बलूचिस्तानची राजधानी असलेल्या जाहेदानमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. जाहेदानमध्ये असलेल्या एका न्यायालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये पाच सामान्य नागरिक तर तीन हल्लेखोरांचा समावेश आहे, तर या हल्ल्यामध्ये तेरा जण जखमी झाले आहेत.

इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या मिजानने दिलेल्या वृत्तानुसार काही शस्त्रधारी लोकांकडून जाहेदानमधील न्यायालयाला टार्गेट करण्यात आलं. हा हल्ला शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला. जेव्हा हल्ला झाला तेव्हा या इमारतीमध्ये न्यायालयाशी संबंधित कामं सुरू होते. हल्ला झाल्याचं कळताच तेथे असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यामध्ये पाच सामान्य लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तीन हल्लेखोर देखील ठार झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देखील या वृत्तसंस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे.

13 जखमी

दरम्यान या हल्ल्यामध्ये तेरा नागरिक जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, हा हल्ला नेमका कोणी केला, या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या कोणत्या गटाचा समावेश होता, याचा शोध इराणकडून घेतला जात आहे.  इराणचा हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये येतो, त्यामुळे या भागात अशा प्रकारचे हल्ले यापूर्वी देखील अनेकदा झाले आहेत. आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी या शहरावर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी न्यायालयावर हल्ला केला. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.