एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्याची माहिती सर्वात अगोदर पाकिस्ताननेच दिली होती. पण या कारवाईत काहीही नुकसान झालं नाही, असं पाकिस्तानने आतापर्यंत छातीठोकपणे सांगितलं. पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा इटलीच्या पत्रकार फ्रान्सिसा मरीनो यांनी फाडलाय. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आलंच, शिवाय पाकिस्तान सैन्याचे काही जवानही यात […]

एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्याची माहिती सर्वात अगोदर पाकिस्ताननेच दिली होती. पण या कारवाईत काहीही नुकसान झालं नाही, असं पाकिस्तानने आतापर्यंत छातीठोकपणे सांगितलं. पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा इटलीच्या पत्रकार फ्रान्सिसा मरीनो यांनी फाडलाय. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचं प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आलंच, शिवाय पाकिस्तान सैन्याचे काही जवानही यात मारले गेल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

मरीनो यांच्या रिपोर्टनुसार, बालाकोट एअर स्ट्राईक आणि तेथील नुकसानीबाबत जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणाहून माहिती जमा करण्यात आली. यामध्ये समोर आलं की भारताच्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर काही जण जखमी झाले. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजता ही कारवाई झाली. यानंतर बालाकोटजवळील पाकिस्तानी सैन्याच्या शिंकीअरी कॅम्पचे जवान सकाळी सहा वाजता घटनास्थळावर पोहोचले. डोंगर चढून जाण्यासाठी या जवानांना जवळपास 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागला.

पाकिस्तानी सैन्याकडून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आणि जखमींना हरकत-उल-मुजाहिद्दीन कॅम्पवर नेण्यात आलं. पाकिस्तानी लष्कराच्या डॉक्टरांनी तिथे दहशतवाद्यांवर उपचार केला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, हरकत-उल-मुजाहिद्दीनमध्ये 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहे. तर उपचार सुरु असतानाच 20 जणांचा जीव गेलाय. जे नीट झाले आहेत, त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलंय.

एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा मरीनो यांनी केलाय. तर उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. मरणाऱ्यांमध्येय 11 प्रशिक्षक, बॉम्ब बनवणारे आणि शस्त्र चालवणाऱ्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. याशिवाय दोन प्रशिक्षक अफगाणिस्तानचे असल्याचं सांगण्यात आलंय. ही घटना बाहेर येऊ नये यासाठी पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि जैशचे सदस्य मृतांच्या कुटुंबीयांकडे गेले आणि तोंड न उघडण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.