
इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध थांबले आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला आहे. परंतु इराणमधील युरेनियम सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. इराणने अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्यास हवाई हल्ल्यांद्वारे इराणची अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्यात येतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गरज पडल्यास आम्ही इराणवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही. जर भविष्यात इराणने संवेदनशील कारवाया पुन्हा सुरू केल्या तर अमेरिका पुन्हा हल्ला करू शकते.
व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणचा अणू प्रकल्प अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असणार आहे. इराण सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या टिप्पणीला लवकरच उत्तर देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले. खामेनी यांनी युद्धबंदीनंतर म्हटले होते की, इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त केला. ही अमेरिकेसाठी मोठी चपराक आहे. इराणच्या अणू प्रकल्पाचे नुकसान नुकसान झाले नाही, हा इराणचा दावाही ट्रम्प यांनी फेटाळून लावला. इराणच्या अणुस्थळांची तपासणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग किंवा इतर कोणत्याही प्रतिष्ठित स्रोताकडून करण्याचे त्यांनी समर्थन केले.
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी दावा केला होता की, अणू प्रकल्पांना कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा आहे की त्यांचे सर्व अणू तळ उद्ध्वस्त केले गेले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी इराणच्या अणू प्रकल्पांचे नुकसान झालेले नाही, असा दावा तो दावा अमेरिका आणि इस्त्रायलसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध १५ दिवसांत संपेल, असा दावा केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यावर भर दिला आहे. तसेच अब्राहम करारांचा विस्तार करण्याचे वक्तव्य केले आहे. युएई आणि इजिप्तच्या सहकार्याने इस्रायलच्या नेतृत्वाखाली गाझामध्ये सरकार चालवण्याची चर्चाही झाली आहे.