
अनेक दशकांपासून बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा सुरु आहे. पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच बलुची लोकांनी स्वातंत्र्यासाठी बंदूक हाती घेतली आहे. अनेक बलुची नेत्यांना फासावर लटकवण्यात आलंय तर अनेक महिलांवर पाकिस्तानी लष्कराने अत्याचार केला आहे. हा सर्व रक्तरंजित लढा अखेरच्या टप्प्यात आल्याचा दावा बलुची नेते करत आहे. मे महिन्यात भारत पाक संघर्ष पेटला. तेव्हा बलुचींनी भारताकडे स्वातंत्र्य चळवळीसाठी मदत मागितली होती. पण आंतरराष्ट्रीय कुटनीतीमुळे भारताने या लोकलढ्याला उघड पाठिंबा दिलेला नाही. पण बलुच आर्मीला भारतच रसद पुरवत असल्याचा पाकिस्तानचा जुनाच आरोप आहे. आता अफगाणिस्तानसोबत पाकचा ताजा संघर्ष उडाला. त्यात तुर्कीने मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे. पण अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार पाकिस्तानला तगडा झटका देण्याची शक्यता आहे. काय आहे मोठी अपडेट? बलुचिस्तान हिरावल्यास पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात ...