
बांगलादेशात केवळ राजकीय उलटफेर होत नसून हा देश एका योजनाबद्ध संस्थागत संकटातून जात आहे. गुप्त माहितीनुसार बांगलादेशाला हळूहळू ‘कंट्रोल्ड ब्रेकडाऊन’ च्या दिशेने ढकलेले जात आहे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात देशाच्या कणा मानल्या जाणाऱ्या संस्थांना अचानक नव्हे तर योजनाबद्ध पद्धतीने कमजोर केले जात असते. यामुळे भारताला देखील सावध रहावे लागणार आहे.
कोणत्याही देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडणे कोणत्याही तात्कालिक राजकीय बदलाचा परिणाम नसून एक योजनाबद्ध रणनितीचा परिणाम आहे. याचा उद्देश्य सत्तेचे संतुलन बिघडवून आणि असे शून्य निर्माण करणे, ज्यात कट्टरपंथी आणि भारत विरोधी ताकदींचा प्रभाव वाढवण्याची चाल आहे.
बांगलादेशचे सैन्य अनेक वर्षांपासून प्रो-इंडिया मानले जात आहे. अलिकडे झालेल्या निदर्शनांनंतर आर्मी चीफ जनरल वाकर उज जमान यांनी भारतीय सैन्य प्रमुख यांच्या केलेला संवाद या विश्वासाला दर्शवत आहे. त्यामुळे रिपोर्टच्या दाव्यानुसार पाकिस्तानची आयएसआय कथितपणे बांगलादेशाच्या सैन्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेशाच्या सैन्याची एकजूट आणि निर्णय क्षमता प्रभावित करण्यासाठी असे केले जात आहे. आयएसआयने अशीच योजना भारतासाठी देखील तयार केलेली आहे.
‘सेलेक्टिव एनफोर्समेंट’ ने बिघडती स्थिती ISI च्या भूमिकेची शंकाच व्यक्त करत नाही तर संकेत देखील देत आहे. गुप्तचर विभागाच्या बातमीनुसार आयएसआय अफवा पसरवणे, वैचारिक ध्रुवीकरण वाढवणे, निवडक अधिकाऱ्यांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नात सक्रीय आहे. सैन्यांच्या संस्थागत मजबूती आणि विश्वासाला कमजोर करणे हा हेतू या मागे आहे. अहवालात निवडणक कारवाईला (Selective Enforcement) देखील मोठा धोका मानला गेला आहे. दंगलखोर आणि समाकंटकांवर भेदभाव पूर्वक कारवाई केली जात असल्याने सुरक्षादलात ही भावना होते की परिस्थिती जाणून बुजून बिघडवली जात आहे. सैन्याचे सर्वोच्च नेतृत्व सध्या सत्तेत दखल करण्यापासून वाचत आहे. परंतू हा रणनिती संयम सैन्याच्या प्रतिष्ठेला धक्का देत आहे.
गुप्तचर एजन्सीच्या मते भारतासाठी सर्वात मोठा धोका स्पिलओव्हर इफेक्टचा आहे.
सीमेपलिकडून घुसखोरी
तस्करी नेटवर्कचा विस्तार
दहशतवादी घटक सक्रीय होणे
बंगालच्या उपसागरात सागरी सुरक्षा धोके
जर सध्या सुरु असलेला ट्रेंड कायम राहिला तर याचा परिणाम केवळ बांगलादेशापर्यंत मर्यादित रहाणार नाही. तर पूर्व भारत, उत्तर – पूर्व आणि समुद्र सुरक्षेवर याचा परिणाम होईल. गुप्तचर रिपोर्ट खूपच स्पष्ट आणि चिंताजनक आहे. बांगलादेशातील परिस्थिती आपोआप बिघडत नसून त्याऐवजी त्या दिशेने देशाला ढकलले जात आहे. या अस्थिरतेचा फायदा भारत विरोधी आणि कट्टरपंथी ताकदींना मिळत आहे. संपूर्ण क्षेत्र एका नव्या सुरक्षा संकटाच्या तोंडावर उभे आहे.