कुणी पलंगावर झोपलं, कुणी चिकन खाल्लं, तर कुणी भला मोठा मासा घेतला; पंतप्रधानांच्या निवासात आंदोलक घुसल्यावर काय घडलं?

Bangladesh People in Ex Pm Sheikh Hasina House : बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या निवासात आंदोलक घुसल्यावर काय घडलं? नागरिकांना मोह आवरेना... कुणी पलंगावर झोपत आराम केला तर कुणी चिकन खाल्लं... बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या निवासातील घटना वाचा सविस्तर...

कुणी पलंगावर झोपलं, कुणी चिकन खाल्लं, तर कुणी भला मोठा मासा घेतला; पंतप्रधानांच्या निवासात आंदोलक घुसल्यावर काय घडलं?
बांग्लादेशमध्ये काय घडतंय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 8:22 PM

बांग्लादेश सध्या दहशतीचं वातावरण आहे. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्या सध्या भारतात आल्या आहेत. असं असतानाच बांग्लादेशमधील परिस्थिती मात्र हाताबाहेर चालली आहे. बांग्लादेशमधील पंतप्रधानांच्या निवासात आंदोलक घुसले. या आंदोलकांनी पंतप्रधान निवासातील जेवणावर ताव मारला. याचे फोटो सध्या समोर आले आहेत. यात कुणी पंतप्रधान निवासातील पलंगावर झोपल्याचं दिसत आहे. तर कुणी चिकन खातंय. तर तर कुणी भला मोठा मासा घेतल्याचं दिसलं. ‘कुणाचं काय तर कुणाचं काय…’ हीच म्हण बांग्लादेशमधील दृश्य पाहिल्यानंतर मनात येते.

आंदोलक पंतप्रधान निवासस्थानात घुसले

शेख हसिना यांनी ढाका शहर सोडल्याची बातमी पसरताच आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानाकडे धाव घेतली. दुपारी तीन वाजता ‘गानोभाबोन’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले. घरात जाताच आंदोलकांनी जल्लोष केला. हे आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचण्याआधीच हसिना आणि त्यांची बहीण तिथून भारताकडे येण्यासाठी निघाल्या होत्या.

तो आला अन् मासा घेऊन गेला…!

जे दिसेल ते आपलं मानत बांग्लादेशमधील लोकांनी पंतप्रधान निवासस्थानातील जेवण ताव मारला… तर कुणी इथल्या किमती वस्तू घेऊन फरार झालं. तर काहींनी या अलिशान वास्तूचा पुरेपुर आनंद घेतला. कुणी सोफ्यावर आरामात बसलं. तर कुणी बेडवर झोपून आराम केला. इतकंच नव्हे तर एकजण तर भलामोठा मासा घेऊन जाताना दिसला. तर कुणी बदक घेतलं. या घटनेचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान निवासातील साहित्य घेऊन फरार

आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाताच त्यांनी धुडगूस घातला. त्याचा व्हीडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. हजारो लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले. तिथं पोलीस कर्मचारी किंवा सुरक्षारक्षकही दिसत नव्हते. या लोकांनी काही काळ या वास्तूत आनंद लुटला. इतकंच नव्हे तर तिथला सोफा, खुर्च्यादेखील लोक उचलून घेऊन जात होते. तर कुणी टीव्ही घेऊन फरार झालं. शेख हसिना यांनी देश सोडताच बांग्लादेशमध्ये हाहा: कार माजला आहे.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.