AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

भारताने शेख हसीना यांना भारतात राहण्याची परवानगी दिल्याने भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच पुन्हा एकदा बांगलादेशात मोठी हिंसा झाली. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी भारताचे नाव न घेता जोरदार टीका केली.

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..
Tarique Rahman
| Updated on: Nov 20, 2026 | 8:00 AM
Share

बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. काही मंत्र्यांच्या घरांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली. याचदरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी थेट नाव न घेता भारतावर निशाणा साधला. आवामी लीग विरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र यावे असे त्यांनी म्हटले. तारिक रहमान गेल्या काही दिवसांपासून विविध देशांचे दाैरे करत आहेत. पण भारत दाैऱ्यावर येण्याकरिता त्यांच्याकडे वेळ नाही. भारताने आमंत्रण देऊनही त्यांनी भारत दाैरा टाळला. त्यातच आता नाव न घेता त्यांना भारतावर जोरदार टीका केली. आवामी लीग पार्टी माजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची आहे. 2024 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्या बांगलादेश सोडून भारतात आल्या. तारिक रहमान यांनी म्हटले की, एका समुहाने आपल्या देशाविरोधात कट रचला आणि त्याची मुख्यकर्ता तिथेच राहतो.

तारिक रहमान यांचे म्हणणे आहे की, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे जे 2024 च्या संघर्षात होते. तारिक रहमान यांनी म्हटले की, आता खूप जास्त झाले आहे. आम्हाला या दहशतवाद्यांना, हत्या करणाऱ्यांना आणि आग लावणाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एक दहशतवादी संघटना देशाविरोधात मोठा कट रचत आहे. आवामी लीग या पक्षाला त्यांनी अगोदरच दहशतवादी म्हटले आहे.

पुढे तारीक रहमान यांनी म्हटले की, मी तुम्हाला सांगत आहे तसे एक मोठा समूह आपल्या देशाविरोधात कट रचत आहे. सीमा ओलांडून ते ज्या देशात पळून गेले तिथेच कट रचला जात आहे. ते आपल्या नेत्याला खुश करणाऱ्यांसाठी हे करत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.

शेख हसीना यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, त्या बांगलादेशात परतणार आहेत. बांगलादेशात त्यांच्या विरोधात काही सुनावणी कोर्टात सुरू आहेत. मात्र, शेख हसीना नक्की कधी बांगलादेशात परतणार याबाबत काही माहिती येऊ शकली नाही. मोहम्मद यूनुस यांचे घर जाळल्याने तारिक रहमान यांना मिरच्या लागल्या आहेत. भारताचे थेट नाव न घेतल्याने भारत यावरकाही बोलण्याची शक्यता कमीच आहे.

Follow Us
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!
एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी...
Gokul Milk : एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी महागलं?
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट...
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट, भाजपवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ