AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Iran War : इस्रायलला मानलं, इराणला मोठा झटका, सर्वात मोठ्या शत्रूला कसं सपंवलं तो VIDEO बघा

Israel Iran War : इस्रायलपासून 1000 किलोमीटर लांब अंतरावर पश्चिम इराणमध्ये प्रवास करत असताना या शत्रूला संपवण्यात आलं. इराणच्या गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याची अचूक माहिती मिळाली.

Israel Iran War : इस्रायलला मानलं, इराणला मोठा झटका, सर्वात मोठ्या शत्रूला कसं सपंवलं तो VIDEO बघा
Iran-Israel War
| Updated on: Jun 21, 2025 | 3:29 PM
Share

इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात इस्रायलला सर्वात मोठ यश मिळालं आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इस्रायलला वारंवार जखमी करण्यात ज्याची महत्त्वाची भूमिका होती, त्यालाच इस्रायलने संपवून टाकलय. इस्रायल डिफेन्स फोर्सने शनिवारी बेहनाम शाहरियारीला संपवल्याची घोषणा केली. तो इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्सचा कमांडर होता. शस्त्रांच ट्रान्सफर करणाऱ्या युनिटची जबाबदारी त्याच्याकडे होती. बेहनाम शाहरियारीसोबत सईद इझादी वरिष्ठ IRGC कमांडर त्याचा सुद्धा खात्मा झाला आहे. मध्य पूर्वेत इराणने इस्रायल विरोधात जे दहशतवादी संघटनांच जाळं उभं केलेलं, त्यांना शस्त्रास्त्र पुरवठयाची जबाबदारी या बेहनाम शाहरियारीवर होती. एकप्रकारे इस्रायलला जखमी करण्यात त्याचा महत्त्वाचा रोल होता.

इस्रायलपासून 1000 किलोमीटर लांब अंतरावर पश्चिम इराणमध्ये प्रवास करत असताना बेहनाम शाहरियारीला संपवण्यात आलं. शाहरियारीला एअर स्ट्राइकमध्ये संपवण्यात आलं. त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. इराण समर्थित दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कसाठी हा एक मोठा धक्का आहे. विविध दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर होती. या दहशतवादी संघटनांना पैसा आणि शस्त्र देऊन उभं करण्यात त्याचा महत्त्वाचा रोल होता.

IRGC च्या युनिट 190 चा हेड

बेहनाम शाहरियारी IRGC च्या युनिट 190 चा हेड होता. हेझबोल्लाह, हमास आणि येमेनच्या हाऊथीला अत्याधुनिक घातक शस्त्रांचा पुरवठा करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. इराणच्या कोम शहरात स्वतंत्र एअर स्ट्राइकमध्ये सईद इझादी मारला गेला. इझादी इराणच्या कोम शहरात सेफ हाऊसमध्ये मारला गेला. इराणच्या गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याची अचूक माहिती मिळाली. हमासने 7 ऑक्टोंबर 2023 रोजी इस्रायलवर जो क्रूर हल्ला केला, त्यामागे त्याची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती. इराण इस्रायलमध्ये फक्त हल्ले करतोय. त्यात इमारती जमीनदोस्त होत आहेत. पण त्यांना इस्रायलच्या कुठल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मारण जमलेलं नाही. दुसऱ्याबाजूला इस्रायल एकएक करुन इराणच्या टॉप कमांडर्सचा खात्मा करत आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....