AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याचे संकेत, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग तणावात आहे. त्यामध्येच युद्धाला दोन महिने पूर्ण होत आहेत पण युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्ध संपण्याऐवजी अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच आता ब्रिटनही या युद्धात उतरण्याचे मोठे संकत आहेत.

इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याचे संकेत, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट..
Iran US war
| Updated on: May 01, 2026 | 1:06 PM
Share

नुकताच लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ब्रिटेन आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. ब्रिटेनकडून इराणवर गंभीर आरोप लावण्यात आला. इराणचे दूतावास आरोप करत म्हटले की, ते लोक फॉल्स फ्लॅग अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. फॉल्स फ्लॅगचा अर्थ असा होतो की, स्वत: नुकसान पोहोचवायचे आणि दुसरा एखाद्या देशावर आरोप करायचा. म्हणजे त्या देशांवर कारवाई करण्यासाठी यांना काहीतरी बहाना मिळू शकतो. इराणने स्पष्ट म्हटले की, लंडनमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आणि त्यांचा काहीच संबंध नाहीये. 29 एप्रिल रोजी लंडनच्या गोल्डर्स ग्रीन परिसरात एका यहूदी व्यक्तीने चाकू हल्ला केला. ज्यात 76 वर्षी वयस्कर व्यक्ती आणि 34 वर्षाचा युवक गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून या घटनेला दहशतवादी घटना म्हणून घोषित करण्यात आले. हल्ला केलेला व्यक्ती 45 वर्षीय मुल ब्रिटिश नागरिक आहे. त्याचा अटक करण्यात आलीये.

हत्येचा प्रयत्न आणि पोलिस अधिकाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इराणच्या लंडनमधील दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, ब्रिटेनमध्ये पसरवले जाणारे नकारात्मक दावे सर्व खोटे आहेत. इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, त्यांच्यावर केले जाणारे सर्व आरोप खोटे आहेत. काहीच पुरावे नसताना इराणवर अशाप्रकारेचे खोटे आरोप केली जात आहेत. दूतावासाने पुढे दावा करत म्हटले की, इराण स्वत: गेल्या कित्येक वर्षापासून दहशतवादाचा शिकार झाला आहे.

तिथे निर्दाेष नागरिक, उच्च अधिकारी आणि वैज्ञानिकांची हत्या झाली. पुढे इराणकडून मोठा दावा करत सांगण्यात आले की, काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सध्याच्या या परिस्थितीबद्दल अगोदरच इशारा दिला होता. फॉल्स फ्लॅग ऑपरेशनबद्दल त्यांनी अगोदरच सांगितले होते. विशेष म्हणजे आता तसेच घडले आहे. मुख्य गोष्टींपासून लक्ष विचलित करण्याकरिता हे सर्व केले जात असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. ब्रिटिश प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी अगोदरच या हल्ल्याचा संताप व्यक्त केला.

इराण आणि अमेरिका यांच्यात अगोदरच प्रचंड तणाव वाढला आहे. त्यामध्येच काही लोकांकडून अंदाज वर्तवला जात आहे की, इराणविरोधात ब्रिटनला या युद्धात उतरायचे असल्याने त्यांच्याकडून मुद्द्याम या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत आणि आरोप केली जात आहेत. ब्रिटन सरकारने कोणतीही घोषणा केली नाही की, ते या युद्धात उतरणार आहेत. पण मुद्द्याम इराणच्या विरोधात वातावरण तयार करून हल्ल्याचे कारण सांगत त्यांना या युद्धात उतरायचे आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम