AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

byju raveendran : बायजूचे फाउंडर रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाकडून मोठा दणका, भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअपच साम्राज्य लयाला

byju raveendran :बायजू ही भारतातील यशस्वी स्टार्टअप कंपनी होती. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवल्याचा त्यांचा दावा होता. पण आता चारही बाजूनी ही कंपनी मोठ्या आर्थिक संकटात असून या कंपनीचं साम्राज्य लयाला चाललं आहे.

byju raveendran  : बायजूचे फाउंडर रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाकडून मोठा दणका, भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअपच साम्राज्य लयाला
byju raveendran
| Updated on: May 27, 2026 | 11:54 AM
Share

भारतातली प्रसिद्ध कंपनी बायजूचे फाऊंडर बायजू रवींद्रन यांच्यामागे लागलेलं अडचणींच शुक्लकाष्ठ थांबण्याचं नाव घेत नाहीय. सिंगापूरच्या एका न्यायालयाने अवमानना प्रकरणात त्यांना सहामहिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्या शिवाय कायदेशीर खर्च म्हणून 90,000 सिंगापुर डॉलरचा (जवळपास 70,500 अमेरिकी डॉलर) दंड ठोठावला आहे. संपत्तीशी संबंधित कोर्टाने दिलेल्या महत्वाच्या आदेशांचं वारंवार उल्लंघन केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.बायजू कंपनीने एकवेळ शिक्षण क्षेत्रात क्रांती आणल्याचा दावा केला होता. या कंपनीच्या संस्थापकाला तुरुंगवासाची शिक्षा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.

न्यायालयाने या बाबतीत कठोर भूमिका घेतली आहे. बायजू रवींद्रन यांना अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम तातडीने भरावी लागेल. त्या शिवाय ‘बीएआर इन्वेस्टको पीटीई’(Beeaar Investco Pte) संबंधित कागदपत्र न्यायालयाला सोपवावी लागतील.रवींद्रन यांच्याविरोधात ही कायदेशीर लढाई कतर इन्वेस्टमेंट अथॉरिटीची सहाय्यक कंपनी लढत आहे. सॉवरेन वेल्थ फंडने त्यावेळी बायजूमध्ये गुंतवणूक केली होती. या टेक कंपनीकडून दबावामुळे कपात सुरु होती. या हाय-प्रोफाईल प्रकरणात ‘ड्रू एंड नेपियर’ ने कतर होल्डिंग्सची बाजू मांडली. ‘फरवेंट चेम्बर्स’ने बायजू इन्वेस्टमेंट्सची बाजू मांडली.

साम्राज्य आता लयास चाललय

बायजू रवींद्रनवरील संकट फक्त सिंगापूर न्यायालयापुरता मर्यादीत नाही. ते जगभरातील गुंतवणूकदारांनी दाखल केलेल्या खटल्यांचा सामना करत आहेत. अमेरिकेतही रवींद्रन यांची स्थिती खराब आहे. तिथे कर्ज देणारा 1.2 बिलियन डॉलरच्या मोठया लोनच्या भरपाईसाठी मोठी कायदेशीर लढाई लढत आहे. ‘थिंक अँड लर्न प्रायवेट लिमिटेड’ची (म्हणजे बायजू) सुरुवात करुन बायजू यांनी भारतीय स्टार्टअप विश्वातील सर्वात यशस्वी कंपनी होण्याचा मान मिळवला. पण आज बायजू रवींद्रन चारही बाजुंनी अडचणीत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून अब्जावधीची गुंतवणूक मिळवून जागतिक अब्जाधीश बनलेल्या या उद्योगपतीच साम्राज्य आता लयास चाललं आहे.

सिंगापूर न्यायालयाच्या या निर्णयावर बायजू रवींद्रन यांच्याकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बायजू रवींद्रन आता सिंगापूरमध्ये आहेत की, अन्य कुठल्या देशात हे सध्या कोणालाही माहिती नाहीय.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार