AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, युद्धाबाबत संपूर्ण जगाला दिली ती खुशखबर; अखेर…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. या घोषणेनंतर आता पुढे काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, युद्धाबाबत संपूर्ण जगाला दिली ती खुशखबर; अखेर...
donald trump and israel lebanon ceasefireImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2026 | 11:58 AM
Share

Israel Lebanon Ceasefire : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही. इस्लामाबदमधील पहिल्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला सुरुवात केली होती. याला उत्तर म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केली. या दोन्ही देशांत सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळेच इराणचे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता संपूर्ण जगाला दिलासा देणारी एक माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याबाबत घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी नेमकी काय घोषणा केली?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनुसार लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात सहमतीने युद्धविरामाची मुदत वाढवण्यात आली आहे. आता पुढचे तीन आठवडे हा युद्धविराम कायम असेल. त्यामुळे या काळात इस्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही. या युद्धविरामाबबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला इस्रायलचे राजदूत येचिएल लायटर आणि लेबॉननचे राजदूत नदा मोवावाद हे उपस्थित होते. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात तीन आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्याची घोषणा केली.

याआधी 10 एप्रिल 2026 रोजी दोन्ही देशांत 10 दिवसांसाठी युद्धविरामावर सहमती झाली होती. ही मुदत येत्या 27 एप्रिल रोजी संपणार होती. त्याआधीच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो आणि इस्त्रायल, लेबनॉन या दोन्ही देशांचे राजदूत यांच्यात ही बैठक झाली आणि युद्धविराम आणखी तीन आठवड्यासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, दोन्ही देशांत एकमेकांवर हल्ला न करण्यावर एकमत झालेले असले तरीही प्रत्यक्षात मात्र हल्ले सुरूच आहेत. युद्धविराम असूनही दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले जात आहेत. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यांत दक्षिण लेबनॉनमध्ये नुकतेच 3 जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पत्रकार अमल खलील यांचाही समावेश आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल