चीनचा संताप, 74 लढाऊ विमानांसह 6 सैन्यांची जहाजं अखेर रवाना, आता काय होणार?

चीननं मोठा निर्णय घेतला आहे, गुरुवारी सध्यांकाळपासून ते शुक्रवारी सकाळपर्यंत तब्बल 74 लढाऊ विमानांसह सहा सैन्यांची जहाज रवाना करण्यात आली आहेत.

चीनचा संताप, 74 लढाऊ विमानांसह 6 सैन्यांची जहाजं अखेर रवाना, आता काय होणार?
| Updated on: Jun 20, 2025 | 5:17 PM

तैवान आणि चीनमधीन तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळपर्यंत चीनने तैवानच्या दिशेनं तब्बल 74 लढाऊ विमानं पाठवली आहेत. त्यापैकी 61 विमानांनी तैवानच्या सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली आहे. ही मध्यरेषा अनौपचारिक सीमा मानण्यात आली आहे, जी रेषा चीन आणि तैवान या दोन देशांना वेगळे करते.

चीन सुरुवातीपासूनच तैवानला आपलाच भाग मानत आला आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या लष्करी कारवायांच्या माध्यमातून तैवानला घाबरवण्याचं काम चीनकडून सुरू आहे. चीनच्या या कारवायांबाबत अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की, चीन तैवानवर दबाव निर्माण करून पाहात आहे. अशा प्रकारच्या लष्करी कारवायांच्या माध्यमातून तैवानच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा डाव आहे. जेव्हा युद्धाची वेळ येईल तेव्हा याचा मनोवैज्ञानिक फायदा आपल्याला मिळावा असा त्यामागे चीनचा उद्देश असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चीनने केवळ 74 लढाऊ विमानंच नाही तर त्यासोबतच 6 चीनी सैन्याची जहाज देखील तैवानच्या दिशेनं पाठवली आहेत.

तैवान आणी चीनमध्ये पुन्हा तणाव भडकण्याचं आणखी एक कारण म्हणजे नुकतंच ब्रिटीश रॉयल नेव्हीचं एक गस्ती जहाज एचएमएस स्पे तैवानच्या सामुद्रधुनीतून गेले. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयानं या भेटीचं उघडपणे स्वागत केलं आहे. तैवानची सामुद्रधुनी हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र असल्याचं यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं. तर यावर प्रतिक्रिया देताना ब्रिटनने म्हटलं आहे की, एचएमएस स्पे चं हे मिशन आंतरराष्ट्रीय कायदे आणि सागरी हक्कांनुसार झाले आहे. हे नेव्हिगेशन मुक्त आणि खुल्या इंडो- पॅसिफिकच्या संकल्पनेला बळकटी देते.

मात्र त्यानंतर चीनचा चांगलाच संताप झाला आहे, चीनने तैवानच्या दिशेनं 74 लढाऊ विमानं पाठवली आहेत. त्यापैकी 61 विमानांनी तैवानच्या सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली आहे.सोबतच 6 चीनी सैन्याची जहाज देखील तैवानच्या दिशेनं पाठवण्यात आली आहेत. चीन तैवानला आपलाच भाग मानत आला आहे, त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या कारवाया या भागात चीनकडून सुरू असतात.