डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चीनचा भडका, 100 टक्के टॅरिफनंतर पहिली मोठी प्रतिक्रिया, अमेरिका…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा टॅरिफ चीनवर लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आता चीनने या निर्णयानंतर पहिली अत्यंत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका चीनकडून करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चीनचा भडका, 100 टक्के टॅरिफनंतर पहिली मोठी प्रतिक्रिया, अमेरिका...
Donald Trump and China
| Updated on: Oct 12, 2025 | 9:55 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. फक्त टॅरिफच नाही तर यासोबतच काही गंभीर आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर केली. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर 100 टक्के टॅरिफ लागणार आहे. भारतावर टॅरिफ लावताना अमेरिकेने कारण दिले होते की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत आहोत. मात्र, चीनवर टॅरिफ लावताना त्यांनी कारण वेगळे सांगितले आहे. आता टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकमेकांच्या पुढे आल्याचे स्पष्ट बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून भारताला सपोर्ट करताना चीन दिसत आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर पहिल्यांदाच चीनकडून मोठी प्रतिक्रिया आली.

चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्तांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफबद्दल बोलताना म्हटले की, या निर्णयामुळे दोन्ही देशातील व्यापार संबंध तणावात येणार आहेत. अमेरिकेच्या या कारवाईमुळे मोठे नुकसान होऊ शकते. प्रत्येकवेळी उच्च टॅरिफ लावण्याची भाषा चीनसोबत करणे योग्य नाही. अमेरिका कायमच वैश्चिक व्यापाराबद्दल बोलताना दिसते. दुसरीकडे स्वत: काय वागते. प्रत्येकवेळी इतर देशांना चुकीचे ठरवले जाते. चीनने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर संताप व्यक्त केला आहे.

आता चीन अमेरिकेच्या विरोधात कडक पाऊले उचलताना दिसत आहे. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने थेट भारताच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. फक्त इतकेच नाही तर त्यांनी भारतासोबत मोठे करार केले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट चीनमध्ये गेले. फक्त हेच नाही तर यावेळी पुतिन, जिनपिंग आणि मोदी एकाच मंचावर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

चीनसाठी देखील अमेरिकेची बाजारपेठ अत्यंत मोठी आहे. चीनमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र,  डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर थेट व्यापारावर मोठा परिणाम होणार हे स्पष्ट आहे. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली आहेत. चीन काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.