चीनमधील राक्षस बाटलीच्या बाहेर, पुन्हा जगाचा वेग थांबणार? काय आहे वुहान कनेक्शन

China Wuhan Lab : चीनमध्ये कोरोना सारखाच नवीन व्हायरस आढळला आहे. त्यामुळे पुन्हा जगाची चिंता वाढली आहे. हा व्हायरस सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने एकच घबराट वाढली आहे. लोकांना लॉकडाऊनचे दिवस आठवले आहेत.

चीनमधील राक्षस बाटलीच्या बाहेर, पुन्हा जगाचा वेग थांबणार? काय आहे वुहान कनेक्शन
| Updated on: Feb 22, 2025 | 11:31 AM

चीनने पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकले आहे. चीनमध्ये कोरोनासारखाच एक नवीन व्हायरस आढळल्याचे समोर येत आहे. प्राण्यांमधून हा व्हायरस मानवामध्ये पसरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा नवीन व्हायरस चीनमधील वुहान प्रयोगशाळेत आढळला आहे. कोरोनामुळे जगाचे कामकाज ठप्प झाले होते. कोरोनाने जगाला वेठीस धरले होते. Bloomberg ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या एका संशोधकाने या नवीन व्हायरस, जीवाणूचा शोध लावला आहे. हा व्हायरस सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने एकच घबराट वाढली आहे. लोकांना लॉकडाऊनचे दिवस आठवले आहेत.

काय केला दावा?

संशोधकांच्या मते, हा व्हायरस मानवाच्या पेशीत प्रवेश करतो. जसा कोरोना मानवी शरीरात प्रवेश करत होता, तसेच या व्हायरसची पद्धत आहे. हा व्हायरस मनुष्य आणि सस्तन प्राण्यांच्या प्रथिनांसोबत तो पेशीत प्रवेश करतो आणि पोखरतो. हा नवीन व्हायरस मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे MERS नावाने ओळखल्या जातो.

2600 लोकांना MERS व्हायरस झाल्याचे उघड

ब्लूमबर्गच्या वृ्त्तानुसार, 2012 ते मे 2024 पर्यंत जवळपास 2600 जणांना MERS व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्यांपैकी 36 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या व्हायरसचे सर्वाधिक प्रकरण सौदी अरबमध्ये सापडले आहे. वुहान व्हायरस रिसर्च सेंटर वटवाघुळातील संक्रमित झालेल्या कोरोना व्हायरसनंतर प्रकाश झोतात आली होती.

कोरोनामुळे जगाला धरले वेठीस

कोरोना व्हायरस हा वुहान प्रयोगशाळेतूनच बाहेर आल्याचा आरोप करण्यात येतो. या कोविड 19 व्हायरसने सर्व जगाचा वेग थांबवला होता. जग जणू ठप्प झाले होते. या व्हायरसमुळे भारतातील कामगार वर्ग, मजूर वर्गाचे हाल उभ्या जगाने पाहिले. त्यानंतर चीनवर टीकेची झोड उठली होती.

जगभरात 1.5 कोटी लोकांचा मृत्यू

कोरोना व्हायरसमळे जगभरात 1.5 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दक्षिण पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिका या देशातील लोकांचा सर्वाधिक जीव गेला होता. WHO च्या अहवालानुसार, भारतात कोविडमुळे 47 लाख जणांचा जीव गेला होता. तर भारत सरकारच्या अहवालानुसार, जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 या दरम्यान 4 लाख 80 हजार जणांचा मृत्यू झाला होता.