AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, रेशनसोबत आता मिळणार हे खास गिफ्ट

Antyodaya Yojana Ration card Holder : रेशनकार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतिक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, रेशनसोबत आता मिळणार हे खास गिफ्ट
सरकारकडून खास गिफ्ट
| Updated on: Feb 22, 2025 | 9:23 AM
Share

स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असते. यावेळी रेशनकार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतिक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे.  काय आहे हे गिफ्ट?

अंत्योदय योजनेत साडी मिळणार

मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणार्‍या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील येत्या होळीलाच रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील जवळपास 44 हजार 160 महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे. दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर लाभार्थ्यांना रेशन दुकानातून मोफत साडीचा वाटप करण्यात येणार असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं.

पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे आहे.

पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार लाभ?

बारामती – 7975 दौंड – 7222 जुन्नर – 6838 पुरंदर – 5285 आंबेगाव – 5137 इंदापूर – 4453 शिरूर – 3990 खेड – 3218 भोर – 1909 मावळ – 1536 मुळशी – 540 हवेली – 251

साडी तपासूनच घ्या

राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर लाभार्थ्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम यापूर्वी सुद्धा राबवण्यात आला होता. गेल्यावर्षी सुद्धा मार्च महिन्यात या साड्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या होत्या. त्यामुळे महिलांचा हिरमोड झाला होता. यावेळी स्वस्त धान्य दुकानावरच या साड्या तपासून घ्या. मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला 355 रुपये मोजले होते. स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप करण्यात येईल. पण साडी स्वस्त धान्य दुकानावरच तपासून घ्या. त्यामध्ये दोष असल्यास लागलीच तक्रार नोंदवा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.