AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये अमेरिका गुंतला असताना तिकडे चीनची भरसमुद्रात दादागिरी, पाहा काय केले ?

इराण युद्धाने पश्चिम आशिया पोळला असताना इकडे चीनने आपली दादागिरी सुरु केली आहे. चीनने दक्षिण समुद्रात ऑपरेशन क्लिअर घोषीत करुन नौकांना हुसकावून लावले आहे.

इराणमध्ये अमेरिका गुंतला असताना तिकडे चीनची भरसमुद्रात दादागिरी, पाहा काय केले ?
jinping
| Updated on: Mar 24, 2026 | 4:49 PM
Share

एकीकडे मध्य पूर्वेत इराणवरील आक्रमणानंतर जगातील बहुतांशी भागातील इंधन पुरवठा बाधित झाला आहे. सर्व जग येथे गुंतले असताना तेथे दक्षिण चीन समुद्रात चीनने आपली दादागिरी सुरु केली आहे. फिलीपाईन्स समुद्र क्षेत्र स्कारबोरो शोल येथे चीनच्या कोस्ट गार्डने पहिल्यांदाच लाईव्ह रेडिओ ब्रॉडकास्टमध्ये क्लिअरिंग ऑपरेशनची घोषणा केली आहे. फिलीपाईन्स कोस्ट गार्डचे प्रवक्ता एडमिरल जे.तरीला यांनी सांगितले की ही घटना पीसीजी मॅरिटाईम डोमेन अवेयरनेस पेट्रोल फ्लाईटच्या दरम्यान नोंदवली गेली आहे.

एमडीए फ्लाईटने कळले की पीसीजीच्या पेट्रोल फ्लाईटने शोलच्या आसपास ६ चीनी कोस्ट गार्ड वेसल्स, २० चायनीझ मॅरिटाईम मिलिशिया वेसल्स आणि १ चीनी पिपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीची वॉरशिप देखील पाहायला मिळाली. फिलीपाईन्सने आरोप केला आहे की त्यांच्या मासेमारी करणाऱ्या नौकांना चीनच्या नौकांनी येथून हुसकावून लावले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की चीनी युद्धनौका कशाप्रकारे फिलीपाईन्सच्या नौकांना त्रास देत आहेत.

या मोहिमेदरम्यान चीनी तटरक्षक दलाने रेडिओवर सिक्युरिटी..!सिक्युरिटी..!सिक्युरिटी..! असा इशारा देत क्लिअरिंग ऑपरेशनची घोषणा केली. यात चार कोऑर्डिनेट्स देण्यात आले. जे स्कारबोरो शोलच्या दक्षिणेकडील भागात एक चौकोण झोन बनवला आहे. या झोनमध्ये उपस्थित वेसेल्सला ११ वाजता सकाळी ६ वाजेपर्यंत क्षेत्र सोडण्याचा इशारा दिला. पीसीजीच्यानुसार हा फिलीपाईन्सच्या मच्छीमारांना घाबरवणे आणि पळवण्याचा प्रयत्न आहे.

२२-२३ मार्चच्या दरम्यान २० हून जास्त फिलीलाईन्सच्या फिशिंग बोट्सना चायनीज कोस्ट गार्डच्या स्पीडबोटनी त्रास दिला आहे. याआधीही चायनीज नौकांनी मच्छीमारांना घेरुन त्यांना शोलपासून दूर जाण्यास भाग पाडले. या घटनेनंतर २ पीसीजी समुद्री नौका आणि ५ पेट्रोल वेसल्स तेथे पाठवण्यात आले. या वेसल्सनी मच्छीमारांना संरक्षण दिले आणि त्यांना आवश्यक वस्तू पुरवल्या म्हणजे ते बराच काळ मासेमारी करु शकतील.

येथे पोस्ट पाहा –

स्कारबोरो शोल काय आहे ?

स्कारबोरो शोल हा दक्षिण चीन समुद्रातील एक वादग्रस्त भाग आहे. यावर चीन, फिलीपाईन्सच नव्हे तर तैवानही दावा करते. सध्या हा भाग चीनच्या वास्तविक ताब्याखाली आहे. हा भाग फिलीपाईन्सच्या लुझोन बेटापासून सुमारे २२० किलोमीटर पश्चिमेत आणि चीनच्या हैनान बेटापासून ८०० किमीवर आहे. स्कारबोरो शोलच्या आजूबाजूचे क्षेत्र सामरिक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे आहे. यामुळे चीन आणि फिलीपाईन्स दोघेही येथे कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. येथे मासे भरपूर असल्याने स्थानिक मच्छीमारांसाठी हे क्षेत्र महत्वाचे आहे. ही जागा प्रमुख शिपिंग लेनच्या जवळ असल्याने येथे मच्छीमार येतात.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार