AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात चीनचा मोठा खेळ, मोठी खळबळ, जग थक्क, थेट चीनच्या दिशेने..

इराण आणि अमेरिका युद्धातमुळे जग जैरीस आले. त्यामध्येच अमेरिकेकडून इराणच्या होर्मुज खाडीत नाकेबंदी करण्यात आली. या युद्धात सातत्याने चीनवर आरोप केले जात आहेत. नुकताच चीनने मोठा दणका अमेरिकेला दिला.

समुद्रात चीनचा मोठा खेळ, मोठी खळबळ, जग थक्क, थेट चीनच्या दिशेने..
Chinese ship
| Updated on: Apr 14, 2026 | 11:52 AM
Share

इराणच्या होर्मुज खाडीत अमेरिकेकडून नाकेबंदी करण्यात आली. अमेरिकेच्या या पावलामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. कोट्यावधीचे नुकसान इराणचे होत आहे. यापूर्वीच या मुद्द्यावर अमेरिकेला चीनने फटकारले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरातून जाणाऱ्या जहाजांवर पाळत ठेवली आहे. अमेरिकेने धोकादायक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या 15 युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामुळे होर्मुज खाडीत स्थिती अधिक भयानक होताना दिसत आहे. अमेरिकेने उचललेल्या या पावलानंतर इराणही शांत बसणार नसल्याचे स्पष्ट आहे. होर्मुजमधून होणाऱ्या तेल आणि वायूच्या वाहतुकीसंदर्भातील संकट अधिक वाढत आहे. अगोदरच होर्मुज खाडी बंद असल्याने जग जैरीस आले. त्यामध्ये होर्मुजच्या जवळ अमेरिकेने नाकेबंदी केली. गेल्या कित्येक दिवसांपासून होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, त्यांना यश मिळत नाही. त्यानंतर आता त्यांनी थेट नाकेबंदी करण्यात आली.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने नाकेबंदी केलेली असतानाही समुद्रात मोठा गेम चीनने केला. माहितीनुसार, अमेरिकेने निर्बंध लादलेला एक चिनी टँकर अमेरिकेच्या नाकेबंदीला न जुमानता होर्मुज खाडी पार करून चीनच्या दिशेने रवाना झाले. शिपिंग डेटाच्या माहितीनुसार, अमेरिकेने निर्बंध लावलेले असताना एका चिनी टँकरने मंगळवारी होर्मुज खाडी पार केली.

अमेरिकेने लावलेली नाकेबंदी धुडकावून या जहाजाने होर्मुज खाडी पार केली. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून होर्मुज खाडी पार करणाऱ्या जहाजाचे नाव रिच स्टारी आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर होर्मुज खाडी पार करणारे हे पहिले जहाज आहे. चीनने जगाला पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवली. इराणसोबत व्यापार केल्याबद्दल अमेरिकेने या टँकरवर आणि त्याची मालक कंपनी असलेल्या शांघाय शुआनरून शिपिंग कंपनीवर निर्बंध घातले आहेत.

जहाजावर निर्बंध असतानाही जहाजाने थेट होर्मुज खाडी पार केली. या युद्धात अमेरिकेचे हे सर्वात मोठे अपयश म्हणावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिच स्टारी जहाज मध्यम पल्ल्याचे मोठे जहाज आहे. या जहाजात 2,50,000 मिथेनॉल आहे. या जहाजावर चिनी कर्मचारी आहेत. एलएसईजीच्या माहितीनुसार, अमेरिकेने निर्बंध घातलेले आणखी एक जहाज  मुरलिकिशन हे देखील मंगळवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने निघाले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?